Tansa reservoir storage : तानसा धरणातही खडखडाट

९.८६ टक्केच पाणीसाठा
Tansa reservoir storage
तानसा धरणातही खडखडाटpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : अप्पर वैतरणा तलाव आटल्यानंतर आता मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा तलावातही खडखडाट झाला आहे. सध्या ९.८६ टक्के म्हणजे १४ हजार ३११ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक असून तो जेमतेम ४ ते ५ दिवस पुरेल इतका आहे.

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या ६ तलावांमध्ये १४.६६ टक्के म्हणजे २ लाख १२ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. तर शहराला सर्वाधिक २ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावामध्ये १३.८६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Tansa reservoir storage
Mumbai Water Crisis: मुंबईकरांना पाणीचिंता! तलावांनी गाठला तळ; 17 टक्के साठा शिल्लक

शहराला दररोज ४०० दशलक्ष जास्त पाणीपुरवठा तानसा तलावातील लीटरपेक्षा करणाऱ्या पाणीसाठ्यातही मोठी घट झाली आहे. मान्सून लांबल्यास हा तलाव पूर्णपणे आटण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईला भातसा, मध्य वैतरणा व मोडक सागर या प्रमुख तलावांसह तुळशी व विहार तलावावर अवलंबून राहावे लागणार आहे.

सध्या सर्वाधिक पाणीसाठा भातसा व मोडक सागर तलावांत १ लाख ४३ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यापुढे ही दोन तलाव सर्वाधिक मुंबईकरांची तहान भागवणार आहे. सध्या मुंबईत १० टक्के पाणी कपात असून दररोज ४०० दशलक्ष लिटर पाण्याची बचत केली जात आहे. मात्र बाष्पीभवनमुळे चिंता कायम आहे.

Tansa reservoir storage
Jalkot water scarcity alert : अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news