Tansa Lake Overflow | तानसा तलाव ओसंडला; मुंबईकरांची पाणीटंचाईची चिंता दूर

पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे तलावातील जलसाठ्यात वेगाने वाढ
Tansa Lake Overflow
Tansa Lake OverflowPudhari
Published on
Updated on

Mumbai Water Supply

मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख जलस्रोतांपैकी एक असलेला ठाणे जिल्ह्यातील तानसा तलाव बुधवारी (दि.२२) सकाळी ८.५१ वाजता पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला. पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे तलावातील जलसाठ्यात वेगाने वाढ झाली आहे. या घडामोडीमुळे मुंबईकरांवरील संभाव्य पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे .

यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीला पावसाअभावी तानसा तलावातील पाणीसाठा चिंताजनकरीत्या घटला होता. त्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, जुलै महिन्यात पावसाने जोर धरताच तानसा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले आणि अवघ्या काही दिवसांत तलावाने पूर्ण क्षमता गाठली.

Tansa Lake Overflow
Mumbai Waste Management: कचरा विल्हेवाट मुंबईतच अपरिहार्य; प्रक्रियेसाठी गोराई, मुलुंडचाही पर्याय

तानसा तलावाची एकूण पाणीसाठवण क्षमता १४,५०८ कोटी लिटर (१,४५,०८० दशलक्ष लिटर) इतकी आहे. हा तलाव मुंबईच्या दैनंदिन पाणीपुरवठ्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. येथून दररोज सुमारे ४५० दशलक्ष लिटर पाणी मुंबईला पुरविले जाते. त्यामुळे तानसा भरल्याने शहराच्या जलसाठ्यात मोठी भर पडणार असून पाणीपुरवठा अधिक स्थिर होण्यास मदत होणार आहे.

विशेष म्हणजे, गतवर्षी म्हणजे २०२५ मध्ये तानसा तलाव २३ जुलै रोजी सायंकाळी ५.४० वाजता ओसंडून वाहू लागला होता. यंदा मात्र तो एक दिवस आधीच पूर्ण क्षमतेने भरल्याने मान्सूनची समाधानकारक प्रगती अधोरेखित झाली आहे.

Tansa Lake Overflow
Mumbai Water Tunnel: १,५७५ कोटींचा जलबोगदा! चारकोप ते कांदिवली दरम्यान होणार उभारणी

दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणारा आणखी एक महत्त्वाचा मोडक सागर तलाव देखील पूर्ण क्षमतेच्या उंबरठ्यावर असून तोही कधीही ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील एकूण जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.

तानसा तलाव भरल्याने आणि इतर तलावांमध्येही जलसाठा झपाट्याने वाढत असल्याने मुंबईतील लागू असलेली पाणी कपात लवकरच मागे घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना लवकरच नियमित पाणीपुरवठा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news