Taloja Bar Raid: नोकरी महिला वेटरची, काम ‘छमछम’चे! तळोजातील बारमधून २० महिला वेटर ताब्यात

महिला वेटर ग्राहकांसमोर अश्लील हावभाव व अंगविक्षेप करत असल्याचा आरोप पोलिसांच्या तक्रारीत करण्यात आला आहे.
Taloja Bar Raid
Taloja Bar RaidPudhari
Published on
Updated on

विक्रम बाबर

पनवेल: महिला वेटर म्हणून नोकरीला ठेवायचे आणि ग्राहकांचे मनोरंजन करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून अश्लील हावभाव व नृत्य करून घ्यायचे, असा धक्कादायक प्रकार तळोज्यातील एका बारमध्ये उघडकीस आला आहे.

नावडा फाटा ब्रिजजवळील न्यू महाराष्ट्र हॉटेल अँड बारमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल २० महिला वेटरसह बारमालक, मॅनेजर आणि पुरुष वेटर अशा २३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. महिला वेटर ग्राहकांसमोर अश्लील हावभाव व अंगविक्षेप करत असल्याचा आरोप पोलिसांच्या तक्रारीत करण्यात आला आहे.

Taloja Bar Raid
BMC Worker Housing Scheme: मुंबईतील सफाई कामगारांसाठी ३ हजार १०७ सदनिका; पालिकेकडून वर्षअखेरीस होणार वितरण

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, नावडा फाटा ब्रिजजवळील न्यू महाराष्ट्र हॉटेल अँड बारबाहेरकाही व्यक्तींमध्ये मारामारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तळोजा पोलिसांचे बिट मार्शल घटनास्थळी पोहोचले. यावेळी एका महिला कॉलरने पोलिसांना बारमध्ये महिला वेटर ग्राहकांसमोर अश्लील हावभाव करत असल्याचे तसेच हिंदी गाण्यांवर नृत्य सुरू असल्याचे सांगितले.

पोलिसांनी बारमध्ये प्रवेश करून पाहणी केली असता मोठ्या संख्येने महिला वेटर आढळून आल्या. पोलिसांच्या चौकशीनंतर बारमधील २० महिला वेटरची नावे नोकरनाम्याच्या आधारे समोर आली. यावरून ‘वेटर’ म्हणून महिलांची नियुक्ती करून प्रत्यक्षात त्यांच्याकडून ग्राहकांसमोर नृत्य व अश्लील हावभाव करून घेतले जात होते का? याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.

Taloja Bar Raid
Kurla Dowry Harassment Case: कुर्ल्यात विवाहितेने जीवन संपवल; हुंड्यासाठी छळाचा आरोप, पतीसह सासू आणि नणंदेवर गुन्हा दाखल

वेटर की मनोरंजनासाठी नियुक्ती?

पोलिसांच्या तक्रारीत बारमालक, मॅनेजर व पुरुष वेटर यांनी महिला वेटरना ग्राहकांशी अश्लील हावभाव व चाळे करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे महिला वेटरच्या नावावर नियुक्ती करून त्यांच्याकडून नेमके कोणते काम करून घेतले जात होते, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

बारमध्ये महिला वेटरची मोठी संख्या असूनही त्यांच्याकडून ग्राहकांचे मनोरंजन करण्यासाठी अशा प्रकारे नृत्य करवून घेतले जात असेल, तर संबंधित परवाना आणि नियमांमध्ये त्याला परवानगी आहे का, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

कारवाई फक्त बारवरच,की यंत्रणेवरही?

पोलिसांनी २० महिला वेटरसह बारमालक, मॅनेजर व पुरुष वेटर यांच्यावर कारवाई केली असली तरी या प्रकारामागे नेमका सूत्रधार कोण?, महिला वेटरना अशा प्रकारे काम करण्यास कोण भाग पाडत होते? आणि संबंधित बारला यासाठी कोणाची परवानगी होती का?, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

शासनाकडून बारमधील गैरप्रकारांना आळा घालण्याचे आदेश दिले जात असताना प्रत्यक्षात अशा प्रकारांना मोकळीक मिळत असेल, तर नियमांचा धाक नेमका कोणाला, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

‘छमछम’चा धंदा कोणाच्या आशीर्वादाने?

नवी मुंबई, पनवेल परिसरात बारच्या नावाखाली अशा प्रकारांना खतपाणी मिळत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर येतात. तळोज्यातील या कारवाईमुळे पुन्हा एकदा बारमधील कथित ‘छमछम’चा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

विशेष म्हणजे संबंधित बार विहित वेळेपेक्षा अधिक काळ सुरू असल्याचाही आरोप पोलिसांनी केला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने महिला वेटर असलेला बार, ग्राहकांसमोर सुरू असलेले कथित अश्लील नृत्य आणि नियमबाह्य वेळेपर्यंत सुरू असलेला व्यवसाय याची माहिती संबंधित यंत्रणांना आधी का मिळाली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news