

Sushma Andhare
मुंबई : प्रवाहाच्या बाहेर फेकले जातो आहोत का अशी भिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाटत आहे. अजित पवार यांची सरशी होत आहे. मुख्यमंत्री कुरघोडी करत आहेत. त्यामुळे शिंदे यांना भिती वाटत आहे. त्यामुळेच अमित शहा यांच्या मंचावर जाऊन ते शहा यांची भाटगिरी करत आहेत. म्हणूनच त्यांच्या तोंडून ‘जय गुजरात’ असे बाहेर पडले आहे. अशी जळजळीत टीका शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. या विधानामुळे खरी शिवसेना व डुप्लिकेट शिवसेना कोणती हे स्पष्ट झाले असून शिंदे यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे स्वरुप बाहेर आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यातील (Amit Shah Pune visit) कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात' अशी घोषणा दिली. यावरुन ठाकरेंच्या शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका सुरु केली आहे. याच मुद्यावरुन प्रतिक्रीया देताना सुषमा अंधारे यांनी शिंदे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.
पुढे त्या म्हणाल्या की एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राबरोबरच मराठी माणसांची प्रतारणा केली आहे. शिंदे यांच्याकडे एकनिष्ठता किंवा प्रामाणिकपणा हा गुण नाही पण धुर्तपणा ठासून भरला आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून अशी घोषणा झाली आहे. सध्या महाराष्ट्रातील व मुंबईमधील मराठीच्या अस्तितेसाठी सर्व मराठी माणूस एकवटत आहे अशावेळी निवडणूकीसाठी अमराठी मतांची बेगमी करण्याची भाजपचा प्रयत्न सुरु आहे. आणि त्यामुळे मीच तुमचा वफादार आहे असे अमित शहा यांना पटवून देण्यासाठीच शिंदे यांनी शहा यांच्यासमोर भाटगिरी केली आहे.
पुढे त्याम्हणाल्या की मी गुजराती किंवा अमाराठी माणसांना सांगू इच्छितो की जय गुजरात ही घोषणा शिंदे यांच्या तोंडून ऐकूण आनंदी होऊ नका कारण ज्या मराठी मातीशी त्यांची नाळ जोडली आहे त्या मातीशी ते द्रोह करु शकतात, मराठी माणूस मराठी अस्मिता यांच्याशी ते द्रोह करु शकतात. ते उद्या गुजरातीशीं कसे प्रामाणिक राहतील असा सवालही अंधारे यांनी केला. ज्यांनी उद्धव ठाकरेनां चितपट करण्यचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे ते देवेंद्र फडणवीस यांनाही फसवूण सत्ता ताब्यात घेऊ शकतात अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.