Sujata Saunik : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक

राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव
Sujata Saunik appointed as Chief Secretary
राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Pudhari News Network

पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर निवृत्त होत आहेत. त्यांची जागी पहिल्यांदाच एका महिला आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे आदेश काढले आहेत. सुजाता सौनिक राज्याच्या मुख्य सचिव म्हणून धुरा सांभाळणार आहेत. महाराष्ट्रात प्रथमच एका महिला आयएएस अधिकाऱ्याला मुख्य सचिवपदाची जबाबदारी मिळाली आहे.

Sujata Saunik appointed as Chief Secretary
मुंबई-नाशिक महामार्गावर खड्डे; मुख्य सचिवांनी केला लोकलने प्रवास

सुजाता सौनिक जून २०२५ मध्ये निवृत्त होणार आहेत

1987 च्या बॅचच्या IAS अधिकारी सुजाता सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती केली आहे. सौनिक पुढील वर्षी जूनमध्ये निवृत्त होणार आहेत. कडक स्वभाव आणि स्पष्टवक्ते अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्याकडे सध्या राज्याच्या गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार आहे. त्यांना कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या सचिव म्हणून बढती मिळाली होती. त्यांनी सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. सार्वजनिक आरोग्यासह इतर विभागातही त्यांनी काम केले आहे.

Sujata Saunik appointed as Chief Secretary
मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम गणेश चतुर्दशीपर्यंत पूर्ण करा

प्रशासनाचा ३० वर्षांचा अनुभव

सुजाता सौनिक यांना जिल्हा, राज्य आणि संघराज्य स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आरोग्य सेवा, वित्त, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि शांतता, सार्वजनिक धोरण आणि प्रशासनाचा ३० वर्षांचा अनुभव आहे. त्यांचे पती मनोज सौनिक यांची एप्रिल-डिसेंबर 2023 पासून सीएस म्हणून नियुक्ती केली होती. सध्याते मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार म्हणून काम पाहत आहेत.

Sujata Saunik appointed as Chief Secretary
Mumbai-Goa Highway| मुंबई-गोवा महामार्गावरुन विरोधक आक्रमक

दरम्यान, मागील वर्षी ३१ डिसेंबर रोजी नियुक्त झालेले करीर या वर्षी मार्चमध्ये निवृत्त होणार होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news