Maharashtra politics : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना धक्का देत भाजपमधे जोरदार इनकमिंग

दोन माजी आमदारांसह पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश
Maharashtra politics
मुंबई : मोहोळ तालुक्यातील अजित पवार राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील इनकमिंगला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील दोन माजी आमदारांसह विविध पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देत भाजपने मित्रपक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का दिला.

भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला. मोहोळ तालुक्यातील अजित पवार राष्ट्रवादीचे माजी आमदार व सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, मोहोळचे शिवसेना नेते नागनाथ क्षीरसागर, माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

Maharashtra politics
Dharavi redevelopment project : मुलुंड येथील मिठागराची जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पाला

हा पक्षप्रवेश सोहळा पार अजिंक्य राणा पाटील, प्रकाश चौरे, दीपक माळी, अस्लम चौधरी, भरत सुतकर, विक्रांत माने, सज्जन पाटील, जालिंदर लांडे, प्रमोद डाके, राजाभाऊ गुंड, यशोदा कांबळे, राहुल मोहोळ आदींसह अनेक नेत्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला.

Maharashtra politics
BMC elections 2025 : मुंबईत प्रभाग आरक्षण सोडत 11 नोव्हेंबरला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news