ST NCMC Card: एसटीच्या एनसीएमसी कार्डांचा तुटवडा, सर्व्हर डाऊन; रिचार्जच्या तांत्रिक अडचणींनी प्रवाशांचे हाल

एनसीएमसी कार्ड नसल्यामुळे महिला आणि ज्येष्ठांना वाहक तिकीट दरात सवलत देत नसल्याच्याही तक्रारी आहे.
ST NCMC Card
ST NCMC CardPudhari
Published on
Updated on

मुंबई: प्रवाशांच्या सवलतीसारख्या सुविधांसाठी एसटीने सुरु केलेल्या एनसीएमसी कार्डांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच सर्व्हर डाऊन झाल्यामुळे रिचार्जच्या तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याच्या तक्रारीची भर पडत आहे. एनसीएमसी कार्ड नसल्यामुळे महिला आणि ज्येष्ठांना वाहक तिकीट दरात सवलत देत नसल्याच्याही तक्रारी आहे.

ऐन गणेशोत्सवात राज्यभर या कार्ड व्यवस्थेचा तांत्रिक गोंधळ उडाल्याने सवलतीचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या प्रवाशांना पूर्ण तिकीटाचे पैसे मोजावे लागत आहेत. शासनाने ही जाचक अट तातडीने रद्द करावी, अशी मागणी परिवहन मंत्री आणि मुख्य सचिवांकडे करण्यात आली आहे.

ST NCMC Card
Dahisar Taxi Meter Fraud: टॅक्सी-रिक्षांच्या मीटरमध्ये ‘सेटिंग’; पाच चालकांवर पोलीस कारवाई

सवलतीसाठी पात्र असलेली व्यक्ती स्वतः बसमध्ये उपस्थित असतानाही केवळ कार्ड नसल्यामुळे किंवा कार्ड प्रणालीत तांत्रिक अडथळा आल्यामुळे तिला पूर्ण भाडे आकारले जात असेल, तर सवलत नेमकी प्रवाशासाठी आहे की कार्डासाठी, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news