Dahisar Taxi Meter Fraud: टॅक्सी-रिक्षांच्या मीटरमध्ये ‘सेटिंग’; पाच चालकांवर पोलीस कारवाई

दहिसरमध्ये टॅक्सी आणि रिक्षांच्या भाडेमीटरमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट बसवून प्रवाशांकडून जादा भाडे उकळण्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी पाच चालकांवर कारवाई करून पाच वाहने आणि सर्किट जप्त केले.
Dahisar Taxi Meter Fraud
Dahisar Taxi Meter FraudPudhari
Published on
Updated on

मुंबई: टॅक्सी आणि रिक्षांच्या भाडेमीटरमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट बसवून मीटरमध्ये फेरफार करत प्रवाशांकडून जादा भाडे उकळण्याचा प्रकार दहिसरमध्ये उघडकीस आला आहे.

या प्रकरणी दहिसर पोलिसांनी पाच चालकांवर कारवाई केली असून, त्यांच्या ताब्यातील पाच टॅक्सी-रिक्षा आणि मीटरमध्ये फेरफार करण्यासाठी वापरलेले इलेक्ट्रॉनिक रनिंग सर्किट जप्त केले आहे.

दहिसर परिसरातील काही टॅक्सी आणि रिक्षाचालक भाडेमीटरमध्ये तांत्रिक उपकरणाचा वापर करून कृत्रिमरीत्या भाडेवाढ करत असल्याची माहिती दहिसर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या माहितीची खातरजमा करून संबंधित वाहनांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.

१ सप्टेंबर रोजी सायंकाळी एका संशयित टॅक्सीची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी प्रवाशाच्या माध्यमातून टॅक्सीने प्रवास केला. या वेळी टॅक्सीचालकाने भाडेमीटर झाकून ठेवले असल्याचे आढळले. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी टॅक्सी ताब्यात घेतली.

Dahisar Taxi Meter Fraud
India Europe FTA: भारत-युरोप एफटीएच्या यशात महाराष्ट्राची प्रमुख भूमिका:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टॅक्सीची तपासणी केली असता भाडेमीटरमध्ये इलेक्ट्रॉनिक रनिंग सर्किट बेकायदेशीररीत्या जोडून छेडछाड केल्याचे आढळले. या उपकरणाच्या माध्यमातून मीटरच्या रीडिंगमध्ये फेरफार करून प्रवाशांकडून प्रत्यक्ष भाड्यापेक्षा अधिक रक्कम आकारली जात असल्याचे समोर आले.

या चालकाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला. त्यावेळी आणखी चार टॅक्सी आणि रिक्षांच्या भाडेमीटरमध्येही अशाच पद्धतीने इलेक्ट्रॉनिक रनिंग सर्किट बसवून छेडछाड केल्याचे उघड झाले. पोलिसांनी ही पाचही वाहने जप्त केली आहेत.

या प्रकरणी दहिसर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४) तसेच महाराष्ट्र मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dahisar Taxi Meter Fraud
Mumbai APMC Marketing Director: पणन संचालकपदी अप्पर निबंधक संजय कदम; शरद जरे यांच्याकडील अतिरिक्त पदभार काढून घेतला

पाच जणांवर कारवाई

या प्रकरणात जोएब अल्ताफ देशमुख (३२), अमीन रमजान पठाण (३१), रियाज अब्दुलगनी शेख (४५), नाजीर इब्राहिम पटेल (५७) आणि आनंद कुमार नानकप्रसाद राय (६०) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसर पोलिस ठाण्याच्या गुंडाविरोधी पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news