Mumbai News | दक्षिण मुंबईला मिळणार हेरिटेज लूक

South Mumbai Heritage Look | इमारतींना साजेसे पदपथ व स्ट्रीट लाईट
Heritage building Lighting Mumbai
Mumbai Heritage look(Pudhari Photo)
Published on
Updated on

Heritage building Lighting Mumbai

मुंबई : दक्षिण मुंबईत आल्यानंतर पूर्वीची मुंबई अनुभवता यावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने नरिमन पॉईंट, फोर्ट, मरीन ड्राईव्ह, चर्नी रोड, ग्रँट रोड, गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल परिसर, काळा घोडा व अन्य आजूबाजूच्या परिसराला हेरिटेज लूक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने कामे सुरू झाली असून येथील इमारतींना साजेसे असे पदपथ बांधले जात असून स्ट्रीट लाईट उभारल्या जात आहेत.

दक्षिण मुंबईतील मुंबई महापालिका मुख्यालयासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) व परिसरातील इमारती ब्रिटिशकालीन आहेत. अनेक इमारती १०० ते १५० वर्षे जुन्या असून आजही त्या दिमाखात उभ्या आहेत. पण गेल्या ५० वर्षांत दक्षिण मुंबई व आजूबाजूच्या परिसराचा विकास करताना, पदपथाचे जुने दगड काढून टाकण्यात आले. रस्त्यावरील स्ट्रीट लाईटही बदलण्यात आल्या. रस्ते, दुभाजक यांनीही पूर्वीचे वैभव हरवून बसले.

Heritage building Lighting Mumbai
Mumbai Road News | मुंबईतील रस्त्यांची गुणवत्ता तज्ज्ञ संस्था तपासणार!

यात मलाड दगडाचा वापर करून पुन्हा पदपथ बांधण्यासह पदपथावर दगडी लाह्या, वाहतूक बेटांचा विकास, हेरिटेज स्ट्रीट लाईट, इमारतींना साजेसे असे रंगकाम, व अन्य कामे करण्यात येणार आहेत. वर्षभरापूर्वी सीएसएमटी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरील रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात आले असून चर्चगेट ते चेन्नई रोड जाणाऱ्या महर्षी कर्वे रोडलगत पदपथ व हेरिटेज लूक देणाऱ्या स्ट्रीट लाईट बसवण्यात आल्या आहेत. याच पद्धतीने दक्षिण मुंबईतील प्रत्येक रस्त्यावर हेरिटेज लूक असणाऱ्या स्ट्रीट लाईटसह दगडी पदपथ तयार करण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Heritage building Lighting Mumbai
Mumbai Corona News : मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ, महापालिकेकडून जनतेला काळजी घेण्याचे आवाहन

बसथांब्यांचाही लूक बदलणार

मुंबई शहर व उपनगरातील जुने लोखंडी बस स्टॉप व लोखंडी बसथांबे यांचेही लूक बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात १०० बस स्टॉप नावीन्यपूर्ण पद्धतीने बदलण्यात येणार आहेत. ही कामे मुंबई महापालिकासह जिल्हा नियोजन समिती निधीतून करण्यात येणार आहेत.

Heritage building Lighting Mumbai
Mumbai Education News| राज्यात पॉलिटेक्निक प्रवेश सुरू

दिवाळीपूर्वी कामाचा शुभारंभ

दक्षिण मुंबईतील फॅशनेबल कपड्यांचा बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फॅशन स्ट्रीटला हेरिटेज लूक देण्यात येणार आहे. यात हेरिटेज स्ट्रीट लाईटसह दगडी पदपथ, एकसमान स्टॉल व आजूबाजूच्या परिसराचा विकास करण्यात येणार आहे. या कामाच्या निविदा प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार असून दिवाळीपूर्वी या कामाचा शुभारंभ होईल, असे सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news