पोषण आहारात साप, अध्यक्षांचे कारवाईचे निर्देश

पोषण आहारात साप आढळल्याने अध्यक्षांचे कठोर कारवाईचे निर्देश
Snakes in Nutrition, President's Action Directive
पोषण आहारात साप आढळून आल्याच्या घटनेचे पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. काँपोषण आहार संग्रहित फोटो

मुंबई : पोषण आहारात साप आढळून आल्याच्या घटनेचे पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. काँग्रेस सदस्य विश्वजित कदम यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. यावर, सरकारने या घटनेची नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.

विश्वजित कदम यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर हा मुद्दा उपस्थित केला. कदम म्हणाले की, माझ्या मतदारसंघात पोषण आहारात सापाचे पिल्ल सापडले आहे. याचे राज्याचे टेंडर इंडो अलर्ट प्रोटीन कंपनीला दिले आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट असल्याने कंपनी व प्रशासनातील इतर दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

Snakes in Nutrition, President's Action Directive
Weather Forecast Today | घाटमाथा क्षेत्रात पावसाचा जोर वाढणार

कदम यांच्या मागणीची दखल घेत विधानसभा अध्यक्षांनी राज्य सरकारला याची नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. मंगळवारी, पलूस-कडेगाव या मतदारसंघात पोषण आहारात सापाचे पिल्लू सापडल्याची घटना उघडकीस आली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news