गायक सोनू निगमच्या वडिलांचे घर फोडून ७२ लाख पळवले

गायक सोनू निगमच्या वडिलांचे घर फोडून ७२ लाख पळवले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : बॉलीवूड गायक सोनू निगमच्या वयोवृद्ध वडिलांच्या घरात प्रवेश करुन लॉकरमधील सुमारे ७२ लाख रुपयांची कॅश त्यांच्याच कारचालकाने पळवून नेल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. सीसीटिव्ही फुटेजमध्ये हा प्रकार कैद झाला असून पळून गेलेल्या कारचालक रेहानविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

अंधेरीतील ओशिवरा, विंडसर ग्रँड अपार्टमेंटच्या • विंगच्या फ्लॅट क्रमांक ७०२ मध्ये अगमकुमार ए निगम (६७) एकटेच राहतात. त्यांना सोनू आणि निकिता नावाची दोन गायक मुले असून ते दोघेही अंधेरीतच वर्सोवा, सातबंगला काबरा मेट्रो एक आणि नम बंगलोमध्ये राहतात. त्यांच्याकडे रेहान नावाचा एक तरुण कारचालक कामाला होता. त्याचे काम न आवडल्याने त्यांनी त्याला काढून टाकले होते. त्यांच्या बेडरुममध्ये असलेल्या लाकडी कपाटात त्यांनी एक डिजीटल लॉकर ठेवलेले होते. पासवर्डशिवाय ते उघडता येत नाही. अनेकदा ते व्यवसायातील कॅश याच लॉकरमध्ये ठेवत. १८ मार्च आणि १९ मार्चला ते त्यांची मुलगी निकिताकडे गेले होते. घरी परतल्यानंतर त्यांना १८ मार्चला ४० लाख आणि १९ मार्चला ३२ लाख रुपये लॉकरमधून चोरीस गेल्याचे लक्षात आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी निकीताला ही माहिती दिली. निकिताने सोसायटीच्या सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता तिला रेहान हा या दोन्ही दिवशी सोसायटीमध्ये प्रवेश करताना आणि बाहेर पडताना बॅग घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यानेच बोगस चावीने फ्लॅटमध्ये प्रवेश करुन लॉकरमधून ७२ लाख रुपयांची कॅश चोरी केल्याचे स्पष्ट झाले. निकिताने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी रेहानविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदविला आहे. या घटनेनंतर रेहान हा पळून गेला असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news