Shivshahi bus: शिवशाही बसेस बंद होणार? राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय, नेमकं कारण काय?

महाराष्ट्र राज्य मार्गवहन महामंडळाच्या ताफ्यातील दिमाखदार 'शिवशाही' बसेसबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Shivshahi bus
Shivshahi busfile photo
Published on
Updated on

Shivshahi bus

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील दिमाखदार 'शिवशाही' बसेसबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सततचे बिघाड आणि प्रवाशांचा घटता प्रतिसाद पाहता, महामंडळाच्या मालकीच्या ४५३ शिवशाही बसेसचे आता निमआराम आणि साध्या बसेसमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. यामुळे एकेकाळी प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली शिवशाही आता नव्या साध्या अवतारात रस्त्यावर धावताना दिसेल.

Shivshahi bus
Dada Bhuse : विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण गतीने पूर्ण करा

एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या स्वमालकीच्या एकूण ६८८ शिवशाही बसेस आहेत. त्यापैकी ४५३ बसेस सध्या सुस्थितीत असून धावत आहेत. मात्र, या गाड्यांचे आयुर्मान १० वर्षांपेक्षा जास्त नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. वारंवार होणारे तांत्रिक बिघाड आणि वातानुकूलित यंत्रणेतील तक्रारींमुळे या बसेसचे रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवशाही बसेसमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवासी आता या बसकडे पाठ फिरवू लागले होते, हे शासनानेही मान्य केले आहे.

प्रभारी मंत्रिपदावरुन सत्ताधारी - विरोधक भिडले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशन कालावधीपुरता त्यांच्याकडील मंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार इतर मंत्र्यांकडे सोपविल्यावरुन विरोधकांनी मंगळवारी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. मात्र 2019 पासूनच हा नवा पायंडा पाडण्यात आल्याचा खुलासा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला. तसेच यासंदर्भातील संवैधानिक तरतूद वाचून दाखवत विरोधकांच्या आरोपातील हवा काढली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडील सामान्य प्रशासन विभागाचा कार्यभार मंत्री आशिष शेलार यांच्याकडे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील तीन खात्यांचा कार्यभार मंत्री दादाजी भुसे , उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांच्याकडे सोपविला.

Shivshahi bus
Legislative Conflict : प्रभारी मंत्रिपदावरुन सत्ताधारी - विरोधक भिडले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news