

Shivsena Thackeray group protest : आज आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत दुबईत होणार्या भारत आणि पाकिस्तान (India-Pakistan Asia Cup Match) यांच्यातील क्रिकेट सामन्याला ठाकरे गटाच्या शिवसेनेने विरोध दर्शवला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) या सामन्याच्या विरोधासाठी आज राज्यभरात 'माझं कुंकू, माझा देश' आंदोलन करण्यात येत आहे.
माध्यमांशी बोलताना मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय नागरिक पर्यटकाला गेले होते. त्यावेळी पाकिस्तानमधून घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलीहोती. पाकिस्तान भारतावर हल्ला करत असताना आपले पंतप्रधान या देशाविरोधातील क्रिकेट सामना खेळण्यास कशी परवानगी देतात. हिंदू संस्कृतीमध्ये कुंकू हेच सवासीनीसाठी महत्त्वाचे असते. पहलगामध्ये नवविवाहित तरुणीचे कुंकू पुसले गेले. ती तिच्या पतीच्या मृतदेहाजवळ बसली होती. असे असताना तुम्ही पाकिस्तान सोबत का खेळताय आमच्या कुंकूवाची का अहवेलना करतायत, असा सवालही त्यांनी केला. सुवासिनीचा सन्मान असणारे कुंकू आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे, असेही त्यांनी सांगितले.
पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून माझं कुंकू माझा देश आंदोलन सुरू झाले आहे. पुण्यातील लाल महल येथे ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीचे आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेनेच्या महिला आघाडी कडून कुंकू पाठवले जाणार आहे.