Mumbai Hit And Run : वरळी प्रकरणात शिवसेना नेते आणि वाहन चालक पोलिसांच्या ताब्यात

अपघातानंतर मिहीर फरार; पोलिसांचा तपास सुरु
The arrest of the suspected accused in the Worli hit-and-run case got stuck
वरळी हिट अँड रन प्रकरणात संशयित आरोपीच्या वडिलांना अटकPudhari Photo
Published on
Updated on

पुढारी आनलाईन डेस्क : मुंबईत भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला. तर त्या महिलेचा पती जखमी अवस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातानंतर कार चालक मिहीर शहा फरार झाला असून, पोलिसांनी त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. यासोबतच कारचालकला सुद्धा अटक करण्यात आली आहे.

मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शाह आणि आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शिवसेना नेते आणि त्यांचा चालक राजऋषी राजेंद्रसिंह बिदावत यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. सध्या आरोपी मिहीर फरार असून पोलीस त्याच्या प्रेयसीचीही चौकशी करत आहेत. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, कार मिहिर शाहच्या नावावर होती आणि अपघातानंतर मिहीर कार सोडून पळून गेला. अपघातानंतर मिहीरच्या वडिलांना फोन करून घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. बीएमडब्ल्यू कारचा विमा उतरवला नसून मिहीरच गाडी चालवत होता, असेही पोलीस तपासात समोर आले आहे. मिहीरच्या शेजारी आणखी एक व्यक्ती बसली होती, जो त्याचा ड्रायव्हर असल्याचे सांगण्यात आले.

The arrest of the suspected accused in the Worli hit-and-run case got stuck
वरळी हिट अँड रन प्रकरणी कडक कारवाई होईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कायदा सर्वांसाठी समान : मुख्यमंत्री शिंदे

या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कायदा सर्वांसाठी समान आहे. या अपघातात सहभागी असलेली व्यक्ती शिवसेनेच्या नेत्याचा मुलगा आहे का, असे विचारले असता? यावर शिंदे म्हणाले, कायदा सर्वांसाठी समान असून शासन प्रत्येक प्रकरणाकडे त्याच दृष्टिकोनातून पाहते. या अपघातासाठी वेगळे नियम नसून सर्व काही कायद्यानुसारच होईल. ते पुढे म्हणाले की, पोलीस कोणाला वाचवणार नाहीत, मुंबईतील दुर्घटना दुर्दैवी आहे. कठोर कारवाई करण्यासाठी मी पोलिस विभागाशी बोललो आहे.

The arrest of the suspected accused in the Worli hit-and-run case got stuck
मुंबई : वरळीत हिट अँड रन; महिलेचा मृत्यू, कारचालक ताब्यात

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news