Lok sabha Election 2024 Results : मुंबई उत्तर-पश्चिममधून रवींद्र वायकर 48 मतांनी जिंकले, अमोल किर्तीकर यांचा पराभव

Lok sabha Election 2024 Results : मुंबई उत्तर-पश्चिममधून रवींद्र वायकर 48 मतांनी जिंकले, अमोल किर्तीकर यांचा पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभेचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मतमोजणीच्या 26 फेऱ्या झाल्या, तसेच टपाल मतांची मोजणी झाल्यानंतर अमोल गजानन किर्तीकर यांना 4 लाख 52 हजार 596 मते मिळाली, तर रवींद्र वायकर यांना 4 लाख ५२ हजार 644 मते मिळाली. मात्र अमोल किर्तीकर यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केली, ज्यामध्ये अमोल किर्तीकर एका मताने पुढे असल्याचे सांगण्यात आले. पुन्हा मतमोजणी झाल्यानंतर अखेर 48 मतांनी रवींद्र वायकर यांना विजयी घोषित करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news