बाळासाहेबांचे अनमोल पोर्ट्रेट | तब्बल २७ हजार हिऱ्यांनी साकारले अनोखे चित्र

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी अनोखी भेट
Shiv Sena chief Balasaheb Thackeray's portrait decorated with 27 thousand diamonds handed over to Uddhav Thackeray
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं २७ हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द Pudhari Photo
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्‍तसेवा

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे २७ हजार हिऱ्यांनी साकारलेले एक अनोखे पोर्ट्रेट आज (शुक्रवार) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी महाराष्ट्रातील तमाम निष्ठावान शिवसैनिकांकडून सप्रेम भेट म्हणून देण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि ख्यातनाम आटीस्‍ट शैलेश आचरेकर यांच्या कलापूर्तीने सजलेले हे हिऱ्यांनी नटलेले बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट अतिशय आकर्षक झाले आहे.

Shiv Sena chief Balasaheb Thackeray's portrait decorated with 27 thousand diamonds handed over to Uddhav Thackeray
Mumbai Rain : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पाणी कपात रद्द  

शैलेश आचरेकर यांनी यापूर्वी आपल्या केलेमुळे अनेक पुरस्कार मिळवले आहेत. ख्यातनाम कलावंत म्हणून ते सर्वश्रुत आहेत. शैलेश यांनी हिऱ्यांनी साकारलेले बाळासाहेब खरोखर मनमोहक आहेत. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात नक्कीच ते एक प्रमुख आकर्षण ठरेल अशी प्रतिक्रिया हे पोर्ट्रेट स्नेहपूर्वक स्वीकारताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

Shiv Sena chief Balasaheb Thackeray's portrait decorated with 27 thousand diamonds handed over to Uddhav Thackeray
Mumbai Heavy Rainfall : मुंबई आणि उपनगरांत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

२७ हजार डायमंडनी साकारलेले हे पोर्ट्रेट बनवायला सहा महिन्यांचा कालावधी लागला. शैलेश आचरेकर यांनी अतिशय बारकाईन यावर काम केले आहे. यापूर्वी त्यांनी असेच रतन टाटा यांचे पोर्ट्रेट तयार केले होते.

Shiv Sena chief Balasaheb Thackeray's portrait decorated with 27 thousand diamonds handed over to Uddhav Thackeray
Mumbai Vihar Lake | मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! विहार तलाव भरला

उद्धव पोर्ट्रेट देताना त्यांनी पाहता क्षणीच पहिली प्रतिक्रिया अरे वा सुंदर अशी प्रतिक्रिया दिली. या प्रसंगी शिवसेना नेते संजय राऊत, विनायक राऊत, शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर, हिंगोली - नांदेड संपर्काप्रमुख बबन थोरात बाळासाहेब आणि आता उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक रवी म्हात्रे, आर्टिस्ट शैलेश आचरेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news