Live | महाराष्ट्रातील घराघरात शिवछत्रपतींचा जयंती सोहळा

Shiv Jayanti 2025 | शिवनेरीवर पार पडला शिवजन्मोत्सव
Shiv Jayanti 2025
Live | राज्यात शिवजयंतीचा उत्साह file photo
Published on
Updated on

छत्रपती शिवाजी महाराज पहिले स्वातंत्र्य सेनानी : वडेट्टीवार

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. स्वराज्याचे स्वप्न त्यांनी साकारले, खऱ्या अर्थी ते पहिले स्वातंत्र्य सेनानी आहेत, असे काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांनी शिवरायांना अभिवादन केले.

नागपूरमध्ये 'जय भवानी, जय शिवाजी' चा जयघोष

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा सोहळा आज सकाळपासून उपराजधानी नागपुरात जल्लोषात सुरू आहे. महाल गांधी गेट परिसर हजारो शिवभक्तांनी फुलला आहे. सर्वपक्षीयांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन करीत मानाचा मुजरा केला. 'जय भवानी जय शिवाजी'च्या जयघोषात मानवंदना दिली.

कौठाळीच्या नदीपात्रात अवतरली अश्वारूढ शिवरायांची प्रतिकृती

कौठाळी : सोमा लोहार

कौठाळी (तालुका पंढरपूर) येथील भीमा नदी पात्राच्या मध्यभागी अश्वारूढ असलेली शिवरायांची प्रतिकृती साकारली आहे. कौठाळी येथील कलाकार प्रवीण नगरे व सुरज नगरे या बंधुंनी भीमा नदीच्या पात्रामध्ये लोखंडी बॅरलच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांची घोड्यावर बसलेली मूर्ती साकारली आहे.

भीमा नदी पात्राच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांची  प्रतिकृती साकारली आहे.
भीमा नदी पात्राच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकारली आहे.

राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडून अभिवादन

मुंबई | महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि त्यांना पुष्पांजली वाहिली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सुशासन काम करण्याची प्रेरणा देते : पवार

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "दरवर्षी लाखो लोक येथे (शिवनेरी किल्ल्याला) आदरांजली वाहण्यासाठी येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले सर्व नागरिकांसाठी प्रेरणास्थान आहेत. शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुशासन आणि सामाजिक न्याय आजही आपल्याला त्यानुसार काम करण्याची प्रेरणा देतात."

किल्ल्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी टास्क फोर्स

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. दरवर्षी आम्ही या किल्ल्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी येथे येतो. छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक योद्धा नव्हते तर एक चांगले प्रशासक देखील होते. आम्ही त्यांचे सर्व किल्ले विकसित करू. आम्ही सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून छत्रपती शिवरायांना अभिवादन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले.

Shiv Jayanti 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांनी किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले.(source-@CMOMaharashtra)

छत्रपती शिवाजी महाराजांकडून समृद्ध भारतासाठी प्रेरणा; PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवजयंतीनिमित्त एक खास व्हिडिओ पोस्ट करून शिवरायांना अभिवादन केले आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वाहिली पुष्पांजली

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि त्यांना पुष्पांजली वाहिली.

राजस्थानमध्ये शिवजन्मोत्सव, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित 

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आज जयपूर येथील राजभवन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सांगितले की, "राजस्थानमधील मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्यांपैकी एक आहेत.

किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंती सोहळ्याला उपस्थित आहेत.

पुढारी ऑनलाईन डेस्क : रयतेचे स्वतंत्र स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवछत्रपतींचा जयंती सोहळा आज राज्यासह देशभरात विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. शिवजयंतीनिमित्त अवघा महाराष्ट्र शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news