Ganesh Naik Cartoon Controversy: शिंदेसेनेने व्यंगचित्रातून उडवली मंत्री गणेश नाईकांची खिल्ली !

श्रीकांत शिंदेंना ‘माजी खासदार’ करण्याच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर राजकीय टोलेबाजी
Eknath Shinde
Eknath ShindeFile Photo
Published on
Updated on

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना ‌‘माजी खासदार करण्याची‌’ धमकी देणारे भाजपचे नेते व वनमंत्री गणेश नाईक यांची शिवसेनेने एका व्यंगचित्रातून खिल्ली उडवली आहे. शिवसेनेने आपल्या अधिकृत सोशल मिडियावरून हेे व्यंगचित्र व्हायरल केले.

Eknath Shinde
Cooperative Society Membership Case: सहकारी संस्थांच्या मुंबई विभागीय सहनिबंधकांना न्यायालयाने फटकारले

व्यंगचित्रात भाजपनेते व वनमंत्री गणेश नाईक हे त्यांच्यापेक्षा मोठ्या नेत्याला ‌‘माजी करून टाकेल‌’असे धमकावत आहेत. मात्र,त्याचवेळी गणेश नाईकांना त्यांचीच दोन मुले आवरण्याचा प्रयत्न करत असून ‌‘आपण दोनदा माजी झालात‌’ अशी आठवण करून देताना दिसतात. ‌‘माजी करण्याची भाषा करणाऱ्यांनाच माजीपणाची आठवण‌’ असा उपरोधिक संदेश शिवसेनेने या व्यंगचित्रातून दिल्याने राजकिय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news