

नवी मुंबई: डाकार येथे रविवारी झालेल्या युथ ऑलिम्पिकमध्ये १७ वर्षीय शौर्या अंबुरेने १३.५९ सेकंदांची वेळ नोंदवून महिलांच्या १०० मीटर हर्डल्समध्ये कांस्यपदक पटकावले. युथ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी शौर्या ही भारताची पहिली ट्रॅक ॲथलीट ठरली आहे.
शौर्या अंबुरे ही पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि पोलीस उपायुक्त रूपाली अंबुरे यांची कन्या आहे. गेल्या चार वर्षांपासून जेव्हापासून शौर्या अंबुरेला युथ ऑलिम्पिक गेम्सबद्दल समजले, आणि गेल्या वर्षभरात जेव्हा ती गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतून सावरत होती.
शस्त्रक्रियेनंतरच्या तिच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरताना, ठाण्याच्या या १०० मीटर अडथळा शर्यत (हर्डल्स) धावपटूचे एकच ध्येय होते. भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी करणे. जागतिक ॲथलेटिक्सनुसार शुक्रवारपूर्वी शौर्याची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ १३.८६ सेकंद होती. शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीत (सेमी फायनल), तिने १३.७७ सेकंदांची नोंद करत अंतिम फेरी गाठली.
१३.५९ सेकंदांत शर्यत पूर्ण केली आणि ऑस्ट्रियाच्या फिओना श्वार्झला (१३.७६ से.) मागे टाकले. चीनच्या केयी झांगने (१३.१७ से.) सुवर्ण आणि फ्रान्सच्या अण्णा पीटर्सने (१३.५७ से.) रौप्यपदक पटकावले. वर्षाच्या सुरुवातीला डाव्या पायाच्या अँटीरियर क्रूशिएट लिगामेंटच्या शस्त्रक्रियेनंतर शौर्या महिनाभर कुबड्यांच्या आधारावर होती आणि तिला चालताही येत नव्हते.
भारताचा स्टार लांब उडीपटू मुरली श्रीशंकर याने दिलेला मोलाचा सल्ला, प्रशिक्षकांसोबत मैदानावर आणि मैदानाबाहेर घेतलेली कठोर मेहनत आणि दृढ इच्छाशक्ती यामुळे शौर्या पुन्हा डकारसाठी सज्ज झाली.
डकारला रवाना होण्यापूर्वी शौर्याने सांगितले होते, माझ्या खोलीच्या भिंतीवर आणि मोबाईलच्या वॉलपेपरवर युथ ऑलिम्पिकचाच फोटो होता. मी तिथे पोहोचण्याचे स्वप्न सतत मनात बाळगून होते.
अनेक रात्री जागून काढल्या आहेत. हे पदक तिच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या पदकामुळे शौर्याच्या खात्यात आणखी एका सन्मानाची भर पडली आहे. तिच्याकडे २०२५ च्या एशियन अंडर-१८ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक आणि गेल्या वर्षीच्या एशियन युथ गेम्समधील दोन रौप्यपदके आधीपासूनच आहेत. आम्ही २०२२ पासून या स्पर्धेची तयारी करत होतो. मी तिला सांगितले होते की तुझ्या वयानुसार तुला मोठी संधी आहे.
- अजित कुलकर्णी, शौर्या अंबुरेचे प्रशिक्षक