Rohit Datar Wedding : मसाला किंग धनंजय दातार यांचा मुलगा रोहितच्या विवाह सोहळ्याला शाहरुख खान, सोनू निगमची उपस्थिती

मुंबईतील फेअरमाँटमध्ये दोन दिवस रंगला तारांकित सोहळा
Rohit Datar Wedding
दातार आणि नरावडे परिवारासह रोहित व सानिया. pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : 'मसाला किंग' म्हणून ओळखले जाणारे धनंजय दातार आणि त्यांच्या पत्नी वंदना दातार यांनी पुत्र रोहित दातार आणि सानिया नरावडे यांच्या विवाहानिमित २३ व २४ जून रोजी मुंबईतील पेअर माॅंट हॉटेल येथे भव्य दोनदिवसीय विवाह सोहळ्याचे आयोजन केले. या सोहळ्याला उद्योग, कला आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

२३ जून रोजी झालेल्या संगीत सोहळ्याची सुरुवात विनोदवीर कृष्णा अभिषेक आणि राजीव ठाकूर यांच्या विनोदी सादरीकरणाने झाली त्यानंतर बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खान यांच्या आगमनाने वातावरण आणखी रंगले. शाहरूख यांनी आपल्या लोकप्रिय संवादांनी आणि नृत्याने उपस्थितांचे मनोरंजन केले. त्यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा देत काही हलक्याफुलक्या वैवाहिक टिप्सही दिल्या, तसेच, रोहित, सानिया आणि संपूर्ण दातार कुटुंबासोबत नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली.

Rohit Datar Wedding
Fishing Ban : खोल समुद्रातील मच्छिमारी बंद, नौका किनाऱ्यावर

'२४ जून रोजी झालेल्या स्वागत समारंभात सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या सुमधुर गायनाने रंगत आणली. या कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे, वेदना दातार यांनी सोनू निगम यांच्यासोबत 'तेरे हाथ में, मेरा हाथ हो' हे लोकप्रिय गीत सादर केले. त्यांच्या या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

वधू सानियाचे पालक सीमा नरावडे आणि कुमार नरावडे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच, रोहितचा मोठा भाऊ ऋषीकेश दातार आणि त्यांची पत्नी आकांक्षा दातार यांनीही कुटुंबीयांसह आनंदोत्सवात सहभाग घेतला.

दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमाची सांगता स्वादिष्ट भोजनाने झाली. संगीत, नृत्य, सेलिब्रिटींची उपस्थिती आणि कुटुंबीयांचा उत्साह यामुळे हा विवाह सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.

Rohit Datar Wedding
Pune Holi Celebration: पुण्यात उत्साहात होळी; सामाजिक उपक्रम, द्राक्षांचा महानैवेद्य आणि विशेष मुलांचा रंगोत्सव

धनंजय दातार हे मसाला किंग' म्हणून जगभर प्रसिद्ध असून ते अदिल समूह (Adil Group) या भारतीय किराणा व मसाला विक्री क्षेत्रातील आघाडीच्या समूहाचे संस्यापक आहेत. मध्य पूर्वेसह अनेक देशांमध्ये त्यांच्या व्यवसायांचे विस्तृत जाळे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news