रेल्वे सवलतीपासून ज्येष्ठ नागरिक वंचितच

रेल्वे सवलतीपासून ज्येष्ठ नागरिक वंचितच

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  कोरोनाकाळात बंद केलेली ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे प्रवास सवलत आजही बंद आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तिकिटाच्या पूर्ण किंमतीचा आर्थिक भार सहन करावा लागत असून ही सवलत पुन्हा सुरु करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. गेल्या तीन वर्षांत तब्बल १५ कोटी २६ लाख ५३ हजार ४२३ ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वेने प्रवास केला आहे.

भारतीय रेल्वेकडून कोरोनापूर्व काळात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटामध्ये ४० टक्के सवलत दिली जात होती. याशिवाय ५८ वर्षांवरील महिलांना रेल्वे तिकिटात ५० टक्के सवलत दिली जात होती. सर्व प्रकारच्या मेल, एक्स्प्रेस, राजधानी, शताब्दी, दुरांतो रेल्वेगाड्यांमध्ये दिली जाणारी ही सवलत २० मार्च २०२० पासून बंद करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर आता सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. परंतु रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांची ही सवलत मात्र अद्याप सुरू केलेली नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तिकिटाची पूर्ण रक्कम भरावी लागत आहे.

रेल्वेची नकारघंटा कायम

ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटामध्ये कोरोनापूर्व काळात दिली जाणारी सवलत पुन्हा सुरू करावी, अशी शिफारस संसदेच्या स्थायी समितीने मार्च महिन्यात केली होती. परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा प्रकारची सवलत तातडीने पुन्हा सुरू करण्याचा विचार नसल्याचे रेल्- वेने याआधीच स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news