School Name Guideline: ‘ग्लोबल’, ‘इंटरनॅशनल’, ‘सीबीएसई’ शब्दांवर आक्षेप; शाळांच्या नावांबाबत संभ्रम वाढला

शिक्षण संचालनालयाच्या सूचनेनंतर संस्थाचालक आक्रमक; अस्तित्वातील शाळांची नावे बदलण्यास ठाम विरोध
School
SchoolPudhari
Published on
Updated on

मुंबई : शाळांच्या नावांमधील ‌‘ग्लोबल‌’, ‌‘इंटरनॅशनल‌’, ‌‘सीबीएसई‌’ यांसारख्या शब्दांमुळे पालकांची दिशाभूल होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाने या शब्दांचा वापर टाळण्याच्या सूचना दिल्यानंतर राज्यातील शाळा, संस्थाचालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषतः अस्तित्त्वात असलेल्या शाळांची नावे बदलण्याची सक्ती करू नये, अशी ठाम भूमिका घेतली आहे.

School
Maharashtra Municipal Election Results live| अकोल्यात 'वंचित'ची स्थिती काय?

राज्यातील अनेक शाळा प्रत्यक्षात राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असतानाही त्यांच्या नावांमध्ये ‌‘इंटरनॅशनल‌’, ‌‘ग्लोबल‌’, ‌‘सीबीएसई‌’, ‌‘इंग्लिश मिडियम‌’ असे शब्द वापरले जात असल्याचे संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे.

या नावांमुळे संबंधित शाळा आंतरराष्ट्रीय किंवा केंद्रीय मंडळाशी संलग्न असल्याचा चुकीचा समज पालकांमध्ये निर्माण होत असून, त्यातून शैक्षणिक फसवणुकीचा धोका वाढत असल्याचे म्हटले आहे.

School
Election Ink: शाई पुसली जाण्याच्या वादानंतर निर्णय; झेडपी निवडणुकीत काडीनेच बोटाला शाई

या पार्श्वभूमीवर नव्याने मान्यता मागणाऱ्या तसेच दर्जावाढीसाठी प्रस्ताव सादर करणाऱ्या शाळांच्या नावांची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पालक, विद्यार्थी आणि समाजाची दिशाभूल करणारी नावे आढळल्यास ती तत्काळ बदलण्याबाबत शाळा व्यवस्थापनांना सूचित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सध्या अस्तित्त्वात असलेल्या शाळांच्या नावांबाबतही कारवाईचे संकेत देण्यात आल्याने संस्था चालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

School
Municipal Election Voting: 29 महापालिकांच्या मतदानात गोंधळ; शाई पुसली, ईव्हीएम बिघाड, बोगस मतदानाच्या तक्रारी

नाव बदलण्याची प्रक्रिया गैरसोयीची!

महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाच्या निर्देशांना विरोध करत महामुंबई परिसरातील विविध शाळा संस्थाचालक, विश्वस्त आणि मुख्याध्यापकांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत अस्तित्त्वात असलेल्या शाळांच्या नावांमध्ये कोणताही बदल केला जाऊ नये, असा ठाम पवित्रा घेण्यात आला. शाळेचे नाव बदलण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट, खर्चिक आणि प्रशासकीयदृष्ट्या गैरसोयीची असल्याचा सूर बैठकीत उमटला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news