SCERT Assessment Framework 2026-27: चार महिने उलटल्यानंतर मूल्यमापन आराखडा जाहीर; शिक्षकांत नाराजी

२०१०च्या मार्गदर्शक सूचनांशीच साम्य असल्याची टीका
SCERT Assessment Framework 2026-27
SCERT Assessment Framework 2026-27pudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: शैक्षणिक वर्ष सुरू होऊन चार महिने उलटल्यानंतर आणि शिक्षक संघटनांसह शिक्षण क्षेत्रातून सातत्याने पाठपुरावा झाल्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मूल्यमापनाचा आराखडा जाहीर केला आहे.

मात्र, नव्या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या या आराखड्यात मूल्यमापनाच्या पद्धतीत अपेक्षित मूलभूत बदल दिसत नसल्याने शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

विद्यार्थ्यांचे केवळ पाठांतर तपासण्याऐवजी त्यांची आकलनक्षमता, कौशल्ये, चिकित्सक विचारपद्धती, सर्जनशीलता आणि मिळवलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करण्याची क्षमता तपासणारी मूल्यमापन पद्धती विकसित होणे अपेक्षित होते.

मात्र, एससीईआरटीने जाहीर केलेल्या आराखड्याचे स्वरूप पाहता जुन्याच पद्धतीला नव्या अभ्यासक्रमाच्या चौकटीत पुढे नेण्यात आल्याची टीका होत आहे. त्यामुळे नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शालेय शिक्षणात अपेक्षित असलेले बदल प्रत्यक्षात कितपत होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

SCERT Assessment Framework 2026-27
Railway Charging Point: प्रवाशांनो लक्ष द्या! रेल्वे डब्यांतील रात्री चार्जिंगवर बंदी; पॉवर बँक स्फोटानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय

राज्य मुख्याध्यापक महासंघाचे माजी उपाध्यक्ष आणि शिक्षणतज्ज्ञ महेंद्र गणपुले यांनीही या आराखड्याबाबत नाराजी व्यक्त केली. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर तब्बल चार महिन्यांनी आणि प्रचंड पाठपुरावा केल्यानंतर मूल्यमापनाचा आराखडा जाहीर करण्यात आला.

प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनात पाठांतराधारित पद्धत रद्द करून आकलनक्षमता, कौशल्ये, चिकित्सक विचार, सर्जनशीलता आणि ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करण्याची तार्किक वृत्ती यांना महत्त्व देणे आवश्यक होते. मात्र, या दिशेने अपेक्षित बदल झाल्याचे दिसत नसल्याचे गणपुले यांनी म्हटले आहे.

एससीईआरटीने जाहीर केलेला नवीन मूल्यमापन आराखडा आणि २० ऑगस्ट २०१० रोजी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये मोठ्या प्रमाणात साम्य असल्याचे गणपुले यांनी निदर्शनास आणून दिले. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अभ्यासक्रमात बदल केले जात असताना मूल्यमापनाची पद्धतही त्याच दिशेने बदलणे अपेक्षित आहे.

SCERT Assessment Framework 2026-27
Maharashtra Legislative Council Election: विजयापेक्षा काँग्रेसचे 'नरेटिव्ह' निकाली निघाल्याने भाजपला समाधान

विद्यार्थ्यांनी किती माहिती लक्षात ठेवली, यापेक्षा त्यांनी विषय कितपत समजून घेतला, त्यातून कोणती कौशल्ये आत्मसात केली आणि त्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग केला, हे तपासणे महत्त्वाचे आहे. असे असताना जुन्या मार्गदर्शक सूचनांशी साधर्म्य असलेला आराखडा जाहीर झाल्याने राज्य सरकारला नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची शाळांमध्ये नेमकी कोणत्या स्वरूपात अंमलबजावणी करायची आहे, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे गणपुले यांनी सांगितले.

मूल्यमापनातील बदलांबाबत संभ्रम

नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू असताना शिक्षकांना मूल्यमापनाची स्पष्ट आणि वेळेत माहिती मिळणे आवश्यक असते. मात्र, शैक्षणिक वर्षाचे चार महिने उलटल्यानंतर आराखडा जाहीर झाल्याने शाळांच्या नियोजनावर आणि मूल्यमापनाच्या तयारीवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

नव्या शिक्षण धोरणानुसार अपेक्षित असलेली विद्यार्थी-केंद्रित, कौशल्याधारित आणि आकलनाला प्राधान्य देणारी मूल्यमापन पद्धती प्रत्यक्षात आणण्यासाठी आराखड्यात नेमके कोणते बदल केले आहेत, याबाबतही स्पष्टता आवश्यक आहे.

मूल्यमापनातील बदलांबाबत संभ्रम

नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू असताना शिक्षकांना मूल्यमापनाची स्पष्ट आणि वेळेत माहिती मिळणे आवश्यक असते. मात्र, शैक्षणिक वर्षाचे चार महिने उलटल्यानंतर आराखडा जाहीर झाल्याने शाळांच्या नियोजनावर आणि मूल्यमापनाच्या तयारीवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

नव्या शिक्षण धोरणानुसार अपेक्षित असलेली विद्यार्थी-केंद्रित, कौशल्याधारित आणि आकलनाला प्राधान्य देणारी मूल्यमापन पद्धती प्रत्यक्षात आणण्यासाठी आराखड्यात नेमके कोणते बदल केले आहेत, याबाबतही स्पष्टता आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news