Savitrimai Phule Awards: सावित्रीमाई फुले शिक्षक पुरस्कार जाहीर; राज्यातील १२३ शिक्षकांची निवड

मुंबईसह ठाणे, रायगड, पालघरमधील १९ शिक्षकांची निवड!
Savitrimai Phule Awards
Savitrimai Phule AwardsPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर केले आहेत. राज्य निवड समितीच्या शिफारशीनुसार राज्यभरातील विविध प्रवर्गांतील १२३ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील एकूण १९ शिक्षकांचा समावेश आहे. या पुरस्कारांचे वितरण ३ डिसेंबर रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक शिक्षक, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका, विशेष शिक्षक (कला), विशेष शिक्षक (क्रीडा), दिव्यांग शिक्षक तसेच स्काऊट-गाईड अशा विविध प्रवर्गांतून पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

मुंबईतील प्राथमिक शिक्षक प्रवर्गातून समीया तौसीफ शेख (मुंबई पब्लिक स्कूल, मुलुंड), पुष्पा मोहन कोळी (संत कक्कया मार्ग महापालिका उच्च प्राथमिक हिंदी शाळा, धारावी) आणि श्रद्धा सुधाकर रोहोकळे (आकुली मुंबई पब्लिक मराठी शाळा क्रमांक २, कांदिवली) यांची निवड झाली आहे.

Savitrimai Phule Awards
Bhushan Gavai Letter: उच्च न्यायपालिकांतील नियुक्त्यांत विशिष्ट समाजाला झुकते माप; माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे राष्ट्रपतींना पत्र

माध्यमिक शिक्षक प्रवर्गातून विवेक जगन्नाथ थोरात (विवेक विद्यालय, विक्रोळी), सोपान नामदेव मोरे (मराठा मंदिरचे बाबासाहेब गावडे हायस्कूल, वडाळा), मनोहर शिवाजी बाविस्कर (हिमालय हायस्कूल, बोरिवली) आणि डॉ. संजू सुभाष परदेशी (ॲफॅक इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, चेंबूर) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी मुंबईतील डॉ. ममता शशी झा (नरसी मोनजी वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय, विलेपार्ले) यांची निवड झाली आहे. विशेष शिक्षक (कला) प्रवर्गात मनोहर परशुराम म्हात्रे (संदीप विद्यालय, पार्कसाइट, विक्रोळी) यांचा समावेश आहे.

Savitrimai Phule Awards
Kamathipura Redevelopment Project: कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पाला गती; ७ डिसेंबरपर्यंत ५१ टक्के संमतीचे लक्ष्य

ठाणे जिल्ह्यातून प्राथमिक शिक्षक प्रवर्गात वनिता तुकाराम जाधव (ठाणे महापालिका शाळा क्रमांक ५३, पातलीपाडा), माध्यमिक शिक्षक प्रवर्गात गोपाळ हरी शेखांडे (शहा चंदुलाल सरूपचंद विद्यालय, किन्हवली, शहापूर) आणि आदिवासी क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षक प्रवर्गात रेखा सुधाकर पाटील (जिल्हा परिषद शाळा, मुगाव, किन्हवली) यांची निवड झाली आहे.

रायगड जिल्ह्यातून प्राथमिक शिक्षक प्रवर्गात विभावरी संदीप सिंगासने (जिल्हा परिषद शाळा, तळोजे पंचनंद, पनवेल), माध्यमिक शिक्षक प्रवर्गात अनिल पांडुरंग पाटील (लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय, कामोठे) आणि आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक शिक्षक प्रवर्गात राहुल तुळशीराम गायकवाड (जिल्हा परिषद शाळा, गरुडपाडा, कळंब, कर्जत) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

पालघर जिल्ह्यातून प्राथमिक शिक्षक प्रवर्गात संजय वसंत सांखे (जिल्हा परिषद शाळा, खाडीपाडा, सफाळे), माध्यमिक शिक्षक प्रवर्गात हणमंत गणू सरक (के. जे. सोमय्या माध्यमिक विद्यालय, नरेशवाडी, डहाणू) आणि आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक शिक्षक प्रवर्गात ज्ञानेश्वर दिगंबर सरक (जिल्हा परिषद शाळा, कवाडा लिलकपाडा, तलासरी) यांची निवड झाली आहे. विशेष शिक्षक (क्रीडा) प्रवर्गात निलेश आत्माराम गायकवाड (पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासा, डहाणू) यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे.

या पुरस्कारांमध्ये राज्यभरातून प्राथमिक शिक्षक प्रवर्गात ३८, माध्यमिक शिक्षक प्रवर्गात ३९, आदिवासी क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षक प्रवर्गात १९, आदर्श शिक्षिका प्रवर्गात ८, विशेष शिक्षक (कला) प्रवर्गात ८ आणि विशेष शिक्षक (क्रीडा) प्रवर्गात ८ पुरस्कारांचा समावेश आहे. याशिवाय दिव्यांग शिक्षक किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षकासाठी एक, तर स्काऊट आणि गाईडसाठी प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.