Satyamev Jayate Water Cup: दुष्काळाशी लढण्यासाठी एकजूट व्हा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे आवाहन

वर्षा निवासस्थानी स्पर्धेचा शुभारंभ
Satyamev Jayate Water Cup
Satyamev Jayate Water CupPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करून गावे जलसमृद्ध करण्यासाठी शासन, प्रशासन आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या जलसमृद्धीसाठी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ अभियानाला लोकचळवळीचे बळ द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.

या अभियानाच्या माध्यमातून दुष्काळाविरुद्धची लढाई लोकचळवळ म्हणून उभी करावी. आपल्या सर्वांचा एकच पक्ष तो म्हणजे ‘दुष्काळ विरोधी पक्ष’ असून, यासाठी एकजुटीने सर्वांनी काम केले पाहिजे, असेही मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी मांडले.

Satyamev Jayate Water Cup
Wildlife Smuggling Case: पुणे, नवी मुंबईत वन्यजीव तस्करीचे दोन रॅकेट उद्ध्वस्त; ६ जण ताब्यात

अभिनेता आमीर खान यांच्या उपस्थितीत पाणी फाऊंडेशन आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेचा शुभारंभ वर्षा निवासस्थानी करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

यावेी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, अभिनेते आमीर खान, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग, मुख्यमंत्र्यांचे जलविषयक सल्लागार श्रीराम वेदिरे, पाणी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Satyamev Jayate Water Cup
Kurkumbh Pharma Incident: कुरकुंभच्या त्रिमूर्ती फार्मा कंपनीतील घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सलग दोन दिवस पाहणी

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ‘कन्व्हर्जन्स, कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन’ या तीन बाबींवर विशेष भर द्यावा. योजनांचे एकत्रीकरण, त्याबाबतची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचविणे आणि सर्व विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधणे आवश्यक आहे.

पावसाळ्यापूर्वी नियोजित जलसंधारणाची सर्व कामे पूर्ण करावीत. प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मंजुरीच्या प्रक्रियेत विलंब होऊ नये. प्रत्येक दिवस महत्त्वाचा असून, प्रशासनाने ग्रामस्थांच्या आधी तयारीत राहून कामांना गती द्यावी. गावांमध्ये वॉटरशेड आणि सूक्ष्म जलसिंचनाचे शास्त्रीय नियोजन करून सर्व आवश्यक उपचार पूर्ण करणे गरजेचे आहे.

सामूहिक प्रयत्नांतूनच परिवर्तनकारी परिणाम : आमीर खान

‘जलयुक्त शिवार’ अभियानाच्या सुरुवातीच्या काळात राज्य शासनासोबत पाणी फाऊंडेशननेही समांतरपणे काम केले. या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि अवघ्या तीन वर्षांत ७५ तालुक्यांपर्यंत ही चळवळ पोहोचली. प्रशासन, सामाजिक संस्था, पाणी फाऊंडेशन, विविध भागीदार आणि स्वयंसेवक यांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांतून प्रभावी आणि परिवर्तनकारी परिणाम साध्य झाले, असे अभिनेता आमीर खान यांनी सांगितले.

शास्त्रीय पद्धतीने जलस्रोतांचे पुनरुज्जीवन

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यंदा एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण झाली असून, अनेक गावांमधील जलस्रोत आटले आहेत. ही परिस्थिती आव्हानात्मक असली, तरी जलसंधारणाच्या कामांना गती देण्याची संधीही आहे.

जलस्रोतांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून जलसंधारणाच्या माध्यमातून ते पुन्हा जलपरिपूर्ण करणे, भूजल पातळी योग्य राखणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.