

Sanjay Raut On Padalkar :
संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील नेत्यांच्या विधानांची घसरलेली पातळी याचा खरपूस समाचार घेतला. नुकतेच गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांचे स्वर्गवासी वडील राजारामबापू पाटील यांच्याबद्दल खालच्या स्तराला जाऊन वक्तव्य केलं होतं. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हाच मुद्दा पकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांनीच अशा वाचाळवीरांना अभय दिल्याचा दावा केला.
संजय राऊत पडळकरांच्या वक्तव्यावर म्हणाले, 'एकमेकांचे बाप काढण्याची सुरूवात ही नारायण राणे यांच्या मुलानं केली आहे. त्याला फडणवीसांना अभय दिलं.'
राऊत यांनी सहकार महर्षी राजाराम बापू पाटील यांच्या कार्याचे महत्व सांगितलं. राजाराम बापूंचे सहकार क्षेत्रात मोठं योगदान दिलं होतं. त्यांचा संबंध हा स्वासंत्र्य चळवळशी देखील होता. अशा नेत्यांविषय कोणी आणि कोणत्या भाषेत बोलायचं हे कळत नसेल तर त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासला आहे.
राऊत यांनी फडणवीसांनी काही ठराविक माणसं नेमली आहे असा दावा केला. ते म्हणाले, ही टीम फडणवीस आहे. फडणवीस हे संस्कृती आणि संस्काराच्या गोष्टी करतात त्यांनी आधी त्यांच्या टीममधल्या माणसांची शाळा घ्यावी. पडळकरांना आतापर्यंत १२ ते १३ वेळा समज दिली गेली असेल. मात्र जर ते ऐकत नसतील तर याचा अर्थ पडळकरांना बोलण्यासाठी फडणवीसांचा पाठिंबा आहे.
संजय राऊत यांनी जयंत पाटील यांच्यावर एवढा राग का आहे याचं कारण देखील सांगितलं. ते म्हणाले, जयंत पाटील यांच्यावर एवढा राग असायचं कारण म्हणजे जयंतराव त्यांच्या पक्षात म्हणजे भाजपमध्ये यायला तयार नाहीत.' राऊतांनी भाजप अन् संघाच्या पूर्वजांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला आहे का असा सवाल देखील केला.
याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रात आणि देशात धार्मिक आणि धर्मांध वातावरण निर्माम करण्याचं काम सुरू असल्याची देखील टीका केली. हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही असं देखील ते म्हणाले.