

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना चिन्ह आणि पक्ष निकालाची तारीख जवळ आली की, एकनाथ शिंदे यांचे पाय लटपटायला लागलात. पक्षाचा सर्वोच्च न्यायालयात निभाव लागणार नाही. तसं झालं तर आमचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल, असा पुनरुच्चार शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
Sanjay Raut Criticizes Eknath Shinde
मुंबई : देशातील अन्य प्रादेशिक पक्षाचे नेते राज्यातच बसून निर्णय घेतात. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे देखील. राज्यात थांबतात उटसूट दिल्लीला जात नाही; पण सर्वोच्च न्यायालयात शिवसेना चिन्ह आणि पक्ष निकालाची तारीख जवळ आली की, एकनाथ शिंदे यांचे पाय लटपटायला लागलात. ते पळत दिल्लीला जातात आताही ते याच कारणासाठी दिल्ल्ला गेले आहेत. त्यांचे मालक त्या ठिकाणी बसले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बेडूक उड्या. सुरु आहेत. न्यायालयास न्याय करावा लागले. शिंदे यांनी नरेंद्र मोदींपुढे कितीही छापी पिटली तरी काही होणार नाही. एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा भाजपचे अंगवस्त्र आहे. आमच्याकडे सगळे येत असत आतमध्ये काय चर्चा होतात हे आम्हाला माहित आहे, अशा शब्दांमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे मुंबईत काय अस्तित्व आहे. त्यांना भाजप त्यांच्या मागणीनुसार सीट देणार नाही. एकनाथ शिंदे यांचा आता पक्ष राहिला नाही. त्यांचा पक्ष भाजपचा अंगवस्त्र आहे. त्यांना त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागणार आहे. त्यांच्या पक्षाचा सर्वोच्च न्यायालयात निभाव लागणार नाही. तसं झालं तर आमचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल. आमच्या कडे सगळे येत असत आतमध्ये काय चर्चा होतात हे आम्हाला माहित आहे.तुम्ही एखादा चोरलेल्या पक्षाला सगळे हक्क देतात याची दखल घेतली जात आहे. अजून न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. बाळासाहेब यांची शिवसेना ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे 100 पिढ्या आल्या तरी चोरू शकत नाही. कोर्टाला न्याय करावा लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
फलटणमध्ये डॉक्टर तरुणीचा मृत्यू ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मुख्यत्री फलटण दौर्यावर आहेत. फडणवीस स्वतःला गृहमंत्री मानत असतील तर आजच्या कार्यक्रमात ते स्टेज शेअर करणार नाहीत, असेही ते म्हणाले.
१ नोव्हेंबर रोजी मुंबईतील फॅशन स्ट्रीट वरून मोर्चाला सुरवात होईल. मेट्रो सिनेमा आणि मुंबई महाहापालिका पर्यंत असेल. केंद्र सरकारने संपूर्ण देश अदानी यांना विकला आहे, असा आरोप करत बोगसमतदार विरुद्ध आम्ही आवाज उठवला आहे.. निवडणूक आयोगाने चौकशी लावावी आणि सुरवात महाराष्ट्रकपासून करावी. महाराष्ट्रमध्ये मोर्चा आहे .त्याची दाखल घ्यावी लागेल. एक नोव्हंबरला मोर्चा असणार आहे..काँग्रेस राष्ट्रवादी आणि मनसे आणि शेतकरी कामगार पक्ष काम्युनिस्ट पार्टी भारतीय काम्युनिस्त पार्टी समाजवादी पक्ष सगळे असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.