Sanjay Raut : अमित शहांनी 'त्या' जमिनीखाली दडलेल्‍या रहस्यांचा अभ्‍यास करावा : राऊतांचे आवाहन

भाजप अनेक कार्यालये उघडतंय, मुंबईतील मराठी भवन तेवढे अडकून पडलंय
Sanjay Raut : अमित शहांनी 'त्या' जमिनीखाली दडलेल्‍या रहस्यांचा अभ्‍यास करावा : राऊतांचे आवाहन
Published on
Updated on
Summary

मुंबई पालिकेचा निवासी उद्दिष्टासाठी राखीव असलेला भूखंड अवध्या ११ दिवसांत भाजपाने पदरात पाडून घेतला आहे. एकनाथ रिअॅल्टर्स या बिल्डरने भाजपाला हे डील करून दिले आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

Sanjay Raut On BJP New Office

मुंबई : "भाजपकडे आज अमर्याद सत्ता आहे. मुंबईतील भाजपच्‍या नवीन कार्यालयाचे भूमिपूजन करण्‍यासाठी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत आहेत. ते पंचतांकित कार्यालय उद्घाटन करत आहे. नवीन कार्यालय आमचा टीकेचा विषय नाही. भाजप अनेक कार्यालय उघडत आहे. प्रश्न इतकाच आहे मरीन लाईन्स येथे मराठी भाषा भवन अडकून पडले आहे. आता पालिकेचा निवासी उद्दिष्टासाठी राखीव असलेला भूखंड अवध्या ११ दिवसांत भाजपाने पदरात पाडून घेतला आहे. एकनाथ रिॲल्टर्स या बिल्डरने भाजपाला हे डील करून दिले आहे. अमित शहा यांनी भाजपचे नतून कार्यालय उभारले आहे त्‍या जमिनी खाली कोणते रहस्य आहेत, याचा अभ्यास करावा, असे आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी माध्‍यमांशी बोलताना केले.

धांगेकरांचा रिसर्च महत्वाचा

पुणे जैन बोर्डिंग प्रश्‍नी जैन बांधव रस्त्यावर उतरले. आंदोलन केले. अखेर सरकारला नमते घ्‍यावे लागले. जनता काय करु शकते. हे सवांनी पाहिले. हे श्रेय सर्वांचेआहे. रवींद्र धांगेकर प्रमुख नेते आहे. त्यांचा रिसर्च महत्वाचा आहे, असेही राऊत म्‍हणाले.महिला डॉक्‍टर मृत्‍यू प्रकरणी मुख्‍यमंत्री फडणवीस खोटे बोलत आहेत. त्यांनी संवेदनशील असले पाहिजे. महिला डॉक्टरची आत्महत्या हा गंभीर विषय आहे. हा विषय तुम्ही गांभीर्याने घेत नसाल. तुम्ही याला जबाबदार आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

Sanjay Raut : अमित शहांनी 'त्या' जमिनीखाली दडलेल्‍या रहस्यांचा अभ्‍यास करावा : राऊतांचे आवाहन
Sanjay Raut: ...तर आम्हाला केदारनाथला गुफा आहे तिथं हरी हरी करत बसावं लागेल; भाजपच्या दाव्यानंतर राऊत हे काय म्हणाले?

'एक्‍स'च्‍या माध्‍यमातून भाजप कार्यालयाच्‍या उभारणीवर सवाल

आज एक्‍स पोस्‍टच्‍या माध्‍यमातून राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहित काही सवालउपस्‍थित केले आहेत. यामध्‍ये म्‍हटलं आहे की, मरीन लाईन्स येथील निर्मला निकेतनजवळ भाजपाचे नवे टोलेजंग प्रदेश मुख्यालय उभे राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्या भूमिपूजन होणार असून या भूखंडाबाबत महत्त्वाचा दस्तावेज समोर आला आहे. पालिकेचा निवासी उद्दिष्टासाठी राखीव असलेला भूखंड अवध्या ११ दिवसांत भाजपाने पदरात पाडून घेतला आहे. एकनाथ रिअॅल्टर्स या बिल्डरने भाजपाला हे डील करून दिले आहे.

Sanjay Raut : अमित शहांनी 'त्या' जमिनीखाली दडलेल्‍या रहस्यांचा अभ्‍यास करावा : राऊतांचे आवाहन
Sanjay Raut : "कोण काय बोलतय यावर मत व्यक्त करणार नाही" : संजय राऊत असे का म्‍हणाले?

किती वेगाने झाला फाईलचा प्रवास...

  • एकनाथ रिॲल्टर्सने बँकांकडे गहाण ४६ टक्के भूखंड हस्तांतरणासाठी १ एप्रिल २०२५ रोजी मालमत्ता विभागाकडे अर्ज केला. त्याला ४ एप्रिल २०२५ रोजी मंजुरी मिळाली

  • महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटीव्ह फायनान्स कॉर्पोरेशनकडून महापालिकेच्या ताब्यात घेण्यात आलेली उर्वरित ५४ टक्के जागाही लीजवर देण्यासाठी एकनाथ रिअॅल्टर्सचा अर्ज आला. त्यालाही तत्काळ मंजुरी दिली.

  • २१ कोटी २५ लाख १८ हजार १७० रुपये इतके हस्तांतरण अधिमूल्य भरून ही जागा एकनाथ रिअॅल्टर्सने ताब्यात घेतली. पुढच्याच महिन्यात २१ मे २०२५ रोजी अर्ज करून हा पूर्ण भूखंड भाजपा प्रदेश मुख्यालयाकरिता हस्तांतरित करण्यासाठी प्रस्ताव दिला.

  • या अर्जाला दुसऱ्याच दिवशी २२ मे रोजी उपायुक्त (सुधार) यांनी मंजुरी दिली.

  • ३१ मे २०२५ रोजी मक्ता हक्काचे हस्तांतरण पूर्ण करण्यात आले. त्यापोटी भाजपने ८ कोटी ११ लाख इतके हस्तांतरण शुल्क भरला.

  • मुंबई महापालिकेत सध्या भाजपाचे बाहुले असलेले प्रशासक बसले असून नागरी विकासा संदर्भातील प्रश्न अनिर्णीत ठेवण्यात आले आहेत. मात्र भाजपाचा इंटरेस्ट असलेली भूखंडाची एक फाइल राफेल वेगाने फिरवण्यात आली व जेट वेगाने निर्णय घेऊन त्यावर भाजपाचे कार्यालय उभे केले, आपण (अमित शहा) त्याचे उ‌द्घाटन करीत आहात, असेही राऊतांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news