Ravindra Chavan on Congress: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; रवींद्र चव्हाणांचा हल्लाबोल

अमित शहा यांचा कोलकात्यातील व्हिडीओ शेअर करत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका
Ravindra Chavan
Ravindra ChavanPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण, असे टीकास्त्र भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोशल मीडिया पोस्टमधून सोडले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कोलकाता येथील व्हिडीओ शेअर करत त्यांनी काँग्रेसवर घणाघात केला.

Ravindra Chavan
Thackeray Brothers Protest: सीजेपीच्‍या समर्थनार्थ ठाकरे बंधूंचा ठिय्या; आजपासून तीव्र आंदोलनाचा इशारा

रवींद्र चव्हाण यांनी म्हटले की, 'सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण! ज्या राज्यांमध्ये तब्बल ४०-४० वर्षे काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही, तिथे त्यांच्याच मित्रपक्षांची सत्ता होती. व्होटचोरीचा आरोप करणारे राहुल गांधी आणि काँग्रेस नेते याबद्दल तोंडातून ‘ब्र’ देखील काढणार नाहीत.

‘चोराच्या उलट्या बोंबा’ म्हणतात ते हेच!' केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात विविध राज्यांमध्ये किती वर्षांपासून काँग्रेसचा एकही मुख्यमंत्री झालेला नाही, याचा पाढा वाचला. ते म्हणाले की, 'काँग्रेसने या पराभवानंतर आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.

Ravindra Chavan
Amla Railway Reservoir: 'आमला' जलाशय पाणी साठवण क्षमता ३.५ पटीने वाढवली; संभाव्य दुष्काळाशी सामना करण्यासाठी मध्य रेल्वेने केली तयारी

राहुल गांधी नेते झाल्यापासून देशातील नागरिक त्यांच्याविरोधात कौल देत आहेत आणि राहुलच्या नेतृत्वात 'इंडिया आघाडी' पुन्हा मोडण्यास सुरुवात झाली आहे, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news