

Sanjay Raut On Eknath Shinde : "कोण एकनाथ शिंदे? शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सत्तेच्या जीवावरच ते बोलत आहेत. भिजलेला फटाका आहेत. ज्या दिवशी मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निकाल येईल त्या दिवशी ते ठाणे, मुंबई सोडून निघून जातील. पैशाची लढाई करू नका. सत्तेची लढाई करू नका. तुम्ही खर्या शिवसेनेचे गुंड आहात तर गुंडासारखं समोर येऊन बोला, सत्तेच्या मागे लपून पोलिसांच्या मागे लपवून बोलू नका. सत्तेतून बाहेर याला त्या दिवशी कोण कोणाला सोडत ते सांगतो," अशा शब्दांमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. १९) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका केली.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "आनंद दिघे यांचा अपमान करणार्या गद्दारांना ठाणेकर सोडणार नाहीत.आनंद दिघे या एका निष्ठावंत शिवसैनिक होते. शिवसैनिकांना निष्ठेबाबत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी धोका दिला. आनंद दिघे हे तुळशी वृंदावन होतं आणि त्या तुळशी वृंदावनमध्ये उगवलेली ही भांगेची रोपटी आहेत. आनंद दिघे यांच्या ठाण्यातला तुळशी वृंदावनात एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे 40 चोर आहेत ही म्हणजे भांगेची रोपटी आहेत."
विधानसभा निवडणुकीत घोटाळा केला नसता मतदार यादीमध्ये तर गद्दारांच्या तेव्हाच ठिकर्या उडाल्या असत्या. महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला निवडून आणलेच नाही. मी वारंवार सांगतो कारण इतक्या जागा जिंकून हे महाराष्ट्रात कुठेही जल्लोष झाला नाही. निवडणूक यंत्रणेला हाताचे धरून मतदार यादीत घोटाळे करून पैशाचा वापर करून सत्ताधारी जिंकले आहेत, या आरोपाचा पुन्नरुच्चारही राऊत यांनी केला.
विधानसभा निवडणुकीत मतांचा घोटाळा केला तसा आता हे महानगरपालिका निवडणुकीमध्ये चालणार नाही. निवडणूक आयोगावरती विरोधी पक्षांने पहिला हल्ला केला आहे. आमच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जे साटे-लोटे उघड केलं आहे. निवडणूक आयोग कार्यपद्धतीबाबत आपण वारंवार निवेदन देत आहोत. आमची भूमिका सांगत आहोत. पुरावे देत आहोत;पण निवडणूक आयोग ऐकायला तयार नसेल तर निवडणूक आयोगाला रस्त्यावर उतरण दणका द्यावा लागेल, असा इशाराही राऊत यांनी दिला.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात शनिवारी (दि. १८) चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ या सर्वांनी पुढचे पाऊल काय टाकायचं यावर चर्चा झाली. आम्ही निवडणूक आयोगाला सोडणार नाही आणि घोटाळे करणाऱ्यांना सुद्धा माफी नाही. महाराष्ट्राची जनता मुंबई ठाण्याची जनता ही तुमच्या गद्दारांचा ठिकऱ्या उडवल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये बहुसंख्य मराठी आणि हिंदू बांधव आहेत. दिवाळी हा आमचा सगळ्यांचा सण आहे तो काळोखात साजरा करायचा का संपूर्ण काळ आम्ही पाहिलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते मराठी बांधव मोठ्या संख्येने शिवाजी पार्क मध्ये उपस्थित होते.आकाशामध्ये फटाक्यांची रोषणाई केली वाजले फटाके थोडा वेळ एवढा वाईट वाटून घ्यायचं काय होतं, असा सवाल करत पर्यावरण बिघडावा अशा अनेक गोष्टी या राज्यात घडत आहेत, विषयी बोला आमच्या सणांवर बोलू नका, असा टोलाही राऊतांनी सत्ताधार्यांना लगावला.