

Sandip Deshpande On Sanjay Raut Statement : "आमच्या पक्षाची भूमिका हे राज ठाकरे ठरवतात आणि तेच ती भूमिका बोलतात. त्यामुळे आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरेच ठरवतात आणि तेच बोलतील. इतर कोणीही आमच्या पक्षाची भूमिका मांडणार नाही. अजून किती स्पष्ट बोलायचं?", अशा शब्दांत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना सुनावले. राज ठाकरे यांना काँग्रेससोबत युती हवी आहे, असं विधान शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. १३) सकाळी केले होते
"आम्ही कोणताही प्रस्ताव हर्षवर्धन सपकाळ यांना पाठवलेला नाही. त्यामुळे त्यावर बोलण्याचं कारणच नाही. छटपूजेला आमचा विरोध नव्हता; पण त्यातून कोणी राजकीय ताकद दाखवत असेल, तर ते आम्हाला मान्य नाही," असंही देशपांडे यांनी यावेळी सांगितलं.
"लोकशाहीत निवडणूक पारदर्शक व्हावी, असं केवळ विरोधकांनाच नाही, तर सत्ताधाऱ्यांनाही वाटायला हवं. यंत्रणा चांगली असावी, ही केवळ महाविकास आघाडी किंवा विरोधकांची जबाबदारी नाही.या मोहिमेत सत्ताधारी पक्षांनीही सहभागी व्हावं. उद्या निवडणूक आयोगाकडे जे शिष्टमंडळ जाणार आहे, त्याचा महाविकास आघाडीसोबत काहीही संबंध नाही.आम्ही सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण दिलं आहे. उद्या कळेल की कोण येतं. आम्ही सर्वांना निमंत्रण पाठवलं आहे," असंही देशपांडे यांनी स्पष्ट केलं.
"मतचोरी प्रकरणातील आरोपांवरून लोकांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा, यासाठी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनाही आम्ही लेखी निवेदन दिलं आहे.सगळ्यांनी सांगितलं आहे की 'आम्ही येतोय'. याबाबत भाजप, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी अजून कळवलं नाही.आता ज्याला जो अर्थ काढायचा आहे, तो काढा. तुम्ही म्हणाल की युती झाली, तरी आमचा काही आक्षेप नाही," असं मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.