Sandeepa Virk News: 12 लाख फॉलोअर्स असलेल्या इन्फ्लुएन्सरला अटक, EDच्या रडारवर आलेली संदीपा विर्क कोण आहे?

ED arrest Instagram influencer Sandeepa Virk: मनी लाँडरिंग विरोधी कायद्यांतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने (ED) संदीपा विर्क यांच्यावर कारवाई करण्यात केली आहे
Sandeepa Virk news
Sandeepa Virk newsPudhari Photo
Published on
Updated on

Sandeepa Virk News

नवी दिल्ली: इन्स्टाग्रामवर तब्बल 1.2 मिलियन फॉलोअर्स असलेली संदीपा विर्क अडचणीत आली आहे. सक्तवसुली संचालनायलायने (ईडी) संदीपाला आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटक केली असून रिलायन्स ग्रुपच्या एका अधिकाऱ्याशी असलेल्या कथित संबंधांमुळे ती चर्चेत आहे.

अभिनेत्री आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट असल्याचा दावा करणारी संदीपा विर्कला फसवणूक आणि मनी लाँडरिंग विरोधी कायद्यांतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली आहे, असे वृत्तसंस्था पीटीआयने सांगितले.

पंजाब पोलिसांनी नोंदवला FIR

रिलायन्स ग्रुपचे कॉर्पोरेट अफेअर्स अध्यक्ष अंगाराई नटराजन सेतुरामन यांच्याशी असलेल्या तिच्या कथित संबंधांबाबतही तिच्यावर तपास सुरू आहे. मनी लाँडरिंगचे हे प्रकरण पंजाब पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरवर आधारित आहे. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी ईडीच्या पथकाने दिल्ली आणि मुंबईत विविध ठिकाणी छापा टाकला होता. संदिपा विर्क आणि त्याच्या साथीदारांची चौकशी सुरू असून याचप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

संदीपा विर्क कोण आहे?

संदीपा विर्कच्या इन्स्टाग्राम आयडीप्रमाणे, ती अभिनेत्री, उद्योजिका आणि hyboocare.com या स्किनकेअर उत्पादनांच्या वेबसाइटची संस्थापक आहे. ईडीच्या मते, ही वेबसाइट मनी लाँडरिंगसाठीचा “फ्रंट” होती. “God's favourite child” असा बायो असलेल्या तिच्या इन्स्टाग्राम हँडलला 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिच्या दुसऱ्या सोशल मीडिया बायोमध्ये ती प्रमाणित कॉस्मेटॉलॉजिस्ट असल्याचा दावा करते.

इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरची 14 ऑगस्टपर्यंत ED कोठडी

ईडीने मंगळवारी ( दि. १२) तिच्या आणि तिच्या सहकाऱ्यांच्या दिल्ली व मुंबई येथील दोन दिवस चाललेल्या तपासणीनंतर, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत संदीपा विर्क हिला ताब्यात घेतले आहे. संदीपा आणि तिचे सहकारी, “चुकीचे प्रतिनिधित्व” आणि “फसवणूक” करून लोकांकडून खोट्या कारणाखाली पैसे उकळल्याच्या आरोपाखाली ईडीने तपासात आहेत. विशेष न्यायालयाने तिला 14 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

रिलायन्स अधिकारी आणि संदीपा विर्क याचे जवळचे संबंध

एजन्सीच्या निवेदनानुसार, ती सेतुरामन यांच्याशी “बेकायदेशीर लॉबिंग” संदर्भात संपर्कात होती. रिलायन्स कॅपिटल लिमिटेडचे माजी संचालक असलेल्या सेतुरामन यांच्या घरी छाप्यात हे आरोप पुष्टीस आले, असे ईडीचे म्हणणे आहे. वैयक्तिक फायद्यासाठी निधी वळविल्याचाही पुरावा तपासात सापडला आहे,असे ईडीने सांगितले. ईडीच्या मते, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेडच्या सुमारे 18 कोटी रुपयांच्या सार्वजनिक निधीची रक्कम 2018 मध्ये “कर्ज देण्याचे नियम मोडून” सेतुरामन यांना दिली गेली. हे कर्ज अशा अटींवर दिले गेले होते की मूळ रक्कम व व्याजाची परतफेड पुढे ढकलली गेली, अनेक सवलती दिल्या गेल्या आणि कोणतीही योग्य चौकशी करण्यात आली नाही. याशिवाय, रिलायन्स कॅपिटल लिमिटेडने 22 कोटी रुपयांचे गृहकर्जही “नियमांचे उल्लंघन” करून दिले. “या कर्जाचा मोठा भाग शेवटी वळविला गेला आणि न भरलेला राहिला,” असा आरोप ईडीने केला आहे.

सर्व आरोप 'बिनबुडाचे'; रिलायन्स अधिकाऱ्याचे स्पष्टीकरण

सेतुरामन यांनी मात्र हे सर्व आरोप “बिनबुडाचे” असल्याचे सांगून, संदीपा विर्कशी कोणताही संबंध किंवा व्यवहार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी घेतलेले गृहकर्ज नियमांनुसार मंजूर झाले असून ते तारण ठेवलेल्या मालमत्तेच्या आधारे सुरक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.

अस्तित्वात नसलेल्या उत्पादनची विक्री, पारदर्शकतेचा अभाव; ED

संदीपा विर्कच्या वेबसाइटवर एफडीए (FDA) मान्यताप्राप्त ब्युटी प्रॉडक्ट्स विकल्याचा दावा केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात ती उत्पादने अस्तित्वातच नसल्याचे तपासात आढळून आल्याचे ईडीने सांगितले आहे. वेबसाइटवर युजर रजिस्ट्रेशनची सुविधा नाही आणि पेमेंट गेटवेच्या समस्या कायम आहेत. वेबसाइटच्या तपासणीत, सोशल मीडियावरील कमी सहभाग, निष्क्रिय व्हॉट्सअॅप क्रमांक आणि संस्थेबाबत पारदर्शक माहितीचा अभाव आढळला. यावरून ती “खरी” कृतिशील व्यावसायिक नसल्याचे संकेत मिळाले. मर्यादित उत्पादनांची श्रेणी, फुगवलेले दर, एफडीए मान्यतेचे खोटे दावे आणि तांत्रिक विसंगती यावरून वेबसाइट ही निधी पांढरा करण्यासाठीचा फ्रंट असल्याचे स्पष्ट होते, असे ईडीने सांगितले. तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात आली आणि संदीपा विर्कचा सहकारी असल्याचा दावा करण्यात आलेल्या फर्रुख अली याचे निवेदन नोंदविण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news