

मुंबई: भारतीय महसूल सेवा अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात सुरू असलेली चौकशी ही दोन गोपनीय तक्रारी नुसार सुरू आहे. त्याचा माजी मंत्री आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवाब मलिक यांच्याशी कोणताही संबंध नाही. असे अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरो (एनसीबी) ने मंगळवारी बॉम्बे उच्च न्यायालयात स्पष्ट केले, तसे प्रतिज्ञापत्राच सादर केले. त्यामुळे वानखेडेंच्या अडचणी वाढू शकतात.
समीर वानखेडे यांनी त्यांच्या विरुद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या चौकशीला आव्हान देत वानखेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि कमल खाटा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी एनसीबीच्या वतीने याचिकेला आक्षेप घेण्यात आला. दक्षिण-पश्चिम विभागाचे उपमहानिरीक्षक विशाल सनाप यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून वानखडे यांच्या चौकशीचे समर्थन केले.