Samagra Shiksha teachers protest : समग्र शिक्षा अभियान शिक्षकांचे आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

3 हजार 378 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष
Samagra Shiksha teachers protest
मुंबई ः आझाद मैदानातील आंदोलनात राज्यभरातून सहभागी झालेले कर्मचारी.pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत राज्यातील 3 हजार 378हून अधिक कंत्राटी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर आक्रमक भूमिका घेत बेमुदत उपोषण आंदोलन छेडले आहे. 9 मार्चपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला 17 दिवस उलटून गेले तरी शासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने आंदोलन तीव्र झाले आहे.

शालेय शिक्षण विभागातील विविध योजना राबवणारे हे कर्मचारी आंदोलन करत आहेत. ‌‘माझी शाळा सुंदर शाळा‌’, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, ‌‘यू-डायस‌’ डेटा भरणे, शिक्षक प्रशिक्षण, दिव्यांग शिक्षण, मध्याह्न भोजन योजना आदी जबाबदाऱ्या सांभाळणारे हे कर्मचारी गेल्या 18 ते 20 वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. तुटपुंज्या वेतनावर सेवा बजावत असतानाही त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतले जात नसल्याने तीव्र नाराजी आहे.

Samagra Shiksha teachers protest
Bombay High Court : मेळघाट कुपोषण समस्या सोडवण्यात सरकार अपयशी

देवळा तालुक्यातील विष्णू केदारे यांनी सांगितले की, आम्ही 20-25 वर्षे शिक्षण विभागासाठी काम करतोय. आमच्यात अनेक जण उच्चशिक्षित असून पीएचडीधारकही आहेत. तरीही आम्हाला 20 ते 30 हजार रुपयांच्या वेतनावर काम करावे लागते. तर जिल्हा बालरक्षक समन्वयक वैशाली शिंदे यांनीही शासनावर टीका करत, गेली सहा वर्षे आमच्या वेतनात वाढ झालेली नाही. आमच्यापैकी काहींना कायम करून बहुतांश कर्मचारी यांना डावलले जात आहे, हा अन्याय आहे, असे स्पष्ट केले.

Samagra Shiksha teachers protest
Ganesh Naik : वाघ-बिबट्यांची संख्या वाढली, सफारी सुरू करणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news