Mumbai Police: सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसाचा मृत्यू

बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेरील सुरक्षा बंदोबस्तावर तैनात असलेल्या मुंबई पोलिसांच्या एका कर्मचाऱ्याचा ड्युटीदरम्यान मृत्यू झाला.
Mumbai Police Constable Death
Mumbai Police Constable DeathFile Photo
Published on
Updated on

Mumbai Police

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेरील सुरक्षा बंदोबस्तावर तैनात असलेल्या मुंबई पोलिसांच्या एका कर्मचाऱ्याचा ड्युटीदरम्यान मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गणेश रायते (वय ४१) असे मृत पोलीस शिपायाचे नाव आहे.

मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई गणेश रायते हे शुक्रवारी सायंकाळी सुमारे ६ वाजता गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा ड्युटीवर तैनात होते. याच दरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि ते खाली कोसळले.

Mumbai Police Constable Death
Amit Shah Mumbai Visit: अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर; भाजप नेत्यांची बैठक आणि दोन महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थिती

घटनास्थळी उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने वांद्रे येथील भाभा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

गणेश रायते हे मुंबई पोलिसांच्या LA-4 युनिटमध्ये कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट होणार आहे.

Mumbai Police Constable Death
Maratha Reservation: मराठा समाजाचाही ओबीसी प्रवर्गात ‘उपवर्ग’ म्हणून विचार शक्य; राज्य सरकारची उच्च न्यायालयात भूमिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news