Bhatsa Dam Water Storage: भातसा तलावातील पाणीसाठा तफावतीबाबत ‘स्थायी’त गदारोळ! एका आठवड्यामध्ये २८.८४ टक्के पाणी वापर

एका आठवड्यात पाणीसाठा ९८.१३% वरून ६९.२९% झाल्याचे अहवालात नमूद; भाजप नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांचा सवाल
Bhatsa Dam Water Level
Bhatsa Dam Water LevelPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: मुंबई महापालिकेच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भातसा धरणातील पाणीसाठ्याच्या आकडेवारीतील गंभीर तफावतीबाबत जोरदार हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

भाजप नगरसेवक व स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी प्रशासनाच्या अहवालांमधील विसंगत आकडेवारीकडे लक्ष छेडत, हा प्रकार चिंतेचा विषय असल्याचे स्पष्ट केले.

Bhatsa Dam Water Level
Sion Dharavi Flyover Inauguration: सायन-धारावी उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण!

स्थायी समितीसमोर सादर करण्यात आलेल्या अधिकृत तक्त्यांनुसार, ३ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या अहवालानुसार भातसा धरणातील उपयुक्त पाणीसाठा ९८.१३% (७,०३,५९४ द.ल.ली.) दर्शवण्यात आला होता.

तर १० ऑक्टोबर २०२६ रोजी संपलेल्या आठवड्याच्या अहवालानुसार, अवघ्या एका आठवड्यात भातसा धरणातील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी थेट ६९.२९% (६,८९,८७६ द.ल.ली.) अशी घसरल्याचे दाखवण्यात आले आहे.

Bhatsa Dam Water Level
Kopri Lake Incident: कोपरी तलावात बुडून २ चिमुरड्यांचा मृत्यू; दुर्घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांचा रुग्णालयात गोंधळ

पालिका प्रशासनाकडे स्पष्टीकरणाची मागणी

या पार्श्वभूमीवर बोलताना तेजिंदर सिंग तिवाना यांनी प्रशासनाला सवाल केला की, ही केवळ छपाईची चूक आहे? की धरणातून मोठी पाणीगळती होत आहे, अथवा प्रशासनाकडून पाणीसाठ्याची खरी माहिती लपवली जात आहे? प्रशासनाने यावर तात्काळ स्पष्टीकरण देऊन मुंबईकरांना आणि स्थायी समितीला योग्य व अचूक माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news