

मुंबई; पुढारी वृत्तसंस्था : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतलेल्या मुंबई पारबंदर प्रकल्पाची एमएमआरडीए आयुक्तांनी नुकतीच पहाणी करत कामाचा आढावा घेत उर्वरीत कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पाचे ९६.६० टक्के काम पुर्ण झाले असून डिसेंबर पर्यंत या सेतूचे काम पुर्ण केले जाईल असे त्यांनी सांगितले.
शिवडी, न्हावाशेवा सागरी सेतू म्हणुन हा प्रकल्प ओळखला जातो. याचे ९६.६० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामाला वेग देऊन निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी कंत्राटदारांना दिले आहेत. मुखर्जी यांनी प्रकल्पस्थळाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला.
मुंबई- नवी मुंबई दरम्यानचा प्रवास जलद आणि सुकर व्हावा यासाठी एमएमआरडीए २१.८० किमी लांबीच्या शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूची उभारणी करीत आहे. या प्रकल्पाच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. हे काम सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्ण केले जाणार होते. पण काही कारणास्तव हा प्रकल्प रखडला होता. यामुळे आता डिसेंबर २०२३ पर्यंत हा सागरी सेतू वाहतुकीसाठी सुरू करण्याचे उद्दीष्ठ एमएमआरडीएने ठेवले आहे.
या प्रकल्पातील उर्वरित कामे जलदगतीने पुर्ण करून वेळेत हा सेतू खुला करण्यासाठी त्यासाठी दर महिन्याला प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला जात आहे. याचाच भाग म्हणुन आयुक्त मुखर्जी यांनी या प्रकल्पाला भेट देत निर्धारित वेळेत काम पुर्ण करण्याचे आदेश कंत्राटदारांना दिले