रोहिणी हट्टंगडी, अशोक सराफ यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Ashok Saraf,  Rohini Hattangadi
Ashok Saraf, Rohini Hattangadi

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल यंदा ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविले जाणार आहे. नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ दरवर्षी 14 जूनरोजी रंगकर्मींना सन्मानीत केले जाते. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा यशवंत नाटय मंदिर, माटुंगा येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

पुरस्कार प्रदान सोहळा.मराठी नाट्य  परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नाटयसंमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री तसेच नाटय परिषदेचे विश्वस्त उदय सामंत, तहहयात विश्वस्त शशी प्रभू, विश्वस्त मोहन जोशी आणि  अशोक हांडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

व्यावसायिक नाट्य पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट लेखक, अभिनेता संकर्षण कर्‍हाडे, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी (तिन्ही पुरस्कार नियम व अटी लागू नाटकासाठी) तसेच प्रायोगिक नाट्य पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संगीत नाटक संगीत जय जय गौरीशंकर, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक आय एम पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ यांची निवड करण्यात आली आहे.

शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित नाट्य कलेचा जागर स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत विजेते स्पर्धकांचे सादरीकरण पुरस्कार वितरण सोहळ्यात करण्यात येणार आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news