Corn Price In Mumbai: खवय्यांना भाजलेल्या मक्याच्या कणसांची भुरळ, जाणून घ्या आजचे दर

Sweet Corn And Desi Corn | स्वीट व देशी अशा दोन्ही मक्याच्या कणसांना मागणी वाढली आहे.
Monsoon Snacks
Corn, File PhotoPudhari
Published on
Updated on

Monsoon Snacks

नवी मुंबई : पावसाळा सुरू झाला की खवय्ये चवदार, देशी मक्याच्या कणसांची आतुरतेने वाट पहात असतात. भर पावसात भाजलेली गरम कणसे खाण्याचा आनंद काही निराळाच असतो. त्यामुळे अनेकांची पावले सध्या मक्याची कणसे खाण्यासाठी चौका-चौकांत विक्री होत असलेल्या मुख्य रस्त्यांवर लागलेल्या फेरीवाल्यांचा गाड्यांकडे वळत आहेत.

स्वीट व देशी अशा दोन्ही मक्याच्या कणसांना मागणी वाढली आहे. सध्या भाजलेल्या किंवा उकडलेल्या मक्याच्या कणसांना लिंबू, लोणी, चीज, चाटची लज्जत दिली जात आहे. यामुळे कोणाच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. उकडलेले मका कणीस 50 रुपये, उकडलेल्या मक्याची चाट 60 रुपये आणि साधे भाजलेले लिंबू, चाट मसाला लावलेले मक्याचे कणीस 25 रुपयांना विकले जात आहे. पिझ्झा, बर्गर अथवा अन्य फास्टफूड खाण्यापेक्षा तरुणाई मक्याची कणसे खाण्यास पसंती देत आहे. त्यामुळे व्यावसायिकांना हंगामी व्यवसायाचे साधन उपलब्ध झाले आहे. आम्हाला तीन महिने रोजगार उपलब्ध होतो, असे कणीस विक्रेत्यांनी सांगितले.

Monsoon Snacks
Mumbai Taxi News | मुंबई ते नवी मुंबई वॉटर टॅक्सी सुरू होणार

पोषक तत्त्वांचा खजिना

मक्याचे कणीस हे पोषक तत्त्वांनी भरलेले असते. 100 ग्रॅम मक्याच्या कणसात भरपूर पोषक तत्त्वे आढळतात. यात ऊर्जा 96 टक्के, पाणी 73 टक्के, प्रथिने-3.4 ग्रॅम, कार्बोदके-21 ग्रॅम, शर्करा -4.5 ग्रॅम, तंतुमय पदार्थ - 2.4 ग्रॅम व फॅट्स - 1.5 ग्रॅम असतात.

Monsoon Snacks
Food Storage Tips | सावधान! हे ४ पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणे आरोग्यास ठरू शकते घातक!

कणसाचे पोते 650 रुपयांना

गतवर्षी कणसाचे पोते हे 400 ते 500 रुपयांना मिळत होते. यंदा त्यात 200 रुपयांची वाढ झाली आहे. यंदा हिरव्या मक्याचे पोते 600 ते 650 रुपयांना मिळत असले तरीही मागणी वाढली आहे. एका पोत्यात 50 ते 55 नग येतात.

मक्याचे कणीस खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात लोह आढळून येते. त्यामुळे शरीरातील लोहाची उणीव भरुन निघते. लोह प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. यात असलेल्या लोहामुळे अशक्तपणाच्या तक्रारींपासून आराम मिळू शकतो. कणीस हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. कणसातील तंतुमय पदार्थांमुळे पाचन संस्था मजबूत राहते तसेच कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही नियंत्रित राहते.

डॉ शाम यादव, आहार तज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news