shreya kulkarni
अन्नपदार्थांची योग्य साठवणूक ही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते. बऱ्याच वेळा आपण अन्न अधिक काळ ताजं ठेवण्यासाठी थेट फ्रीजमध्ये ठेवतो.
मात्र, काही विशिष्ट अन्नपदार्थ असे आहेत, जे फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांची चव, पोत आणि पोषणमूल्य कमी होऊ शकते. त्यामुळे या अन्नपदार्थांना खोलीच्या तापमानात साठवणे फायदेशीर ठरते.
चला तर पाहूया अशा ४ अन्नपदार्थांची यादी आणि त्यांची योग्य साठवणूक कशी करावी हे जाणून घेऊया
टोमॅटो खोलीच्या तापमानावर ठेवल्यास ते अधिक चविष्ट आणि मऊसर राहतात. फारच पिकलेले किंवा कापलेले टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांच्यात अधिक पक्व होण्याची प्रक्रिया मंदावते, आणि ते थोडे दिवस अधिक टिकतात.
केळी हा एक असा फळप्रकार आहे जो फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे. पिकलेली केळी फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांचा सोल लवकर काळा पडतो. केळी अर्धवट पिकलेली असतील, तर ती खोलीच्या तापमानावरच ठेवावीत जेणेकरून ती नैसर्गिक पद्धतीने पिकतील आणि खाण्यास योग्य बनतील.
सफरचंद फ्रीजमध्ये ठेवले जातात, पण त्याऐवजी जर ती थंड, अंधाऱ्या आणि हवेशीर जागेत जाळीदार बॅगमध्ये ठेवली गेले तर तीसुद्धा ताजे राहू शकतात. अशा प्रकारची साठवणूक त्यांची नैसर्गिक गोडी टिकवून ठेवते व जास्त काळ वापरासाठी योग्य ठरते.
बटाट्यांना फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यातील स्टार्चचे रूपांतर साखरेत होते, ज्यामुळे त्यांची चव बदलते आणि ते शिजवल्यावर गोडसर लागतात. बटाट्यांना हवेशीर, थंड आणि कोरड्या जागेत साठवावे आणि दोन आठवड्यांच्या आत वापरावे.