

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक पदांवर कंत्राटी तत्त्वावर नियुक्त्या देण्याच्या सुधारित कार्यपद्धतीस गुरुवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे बिगर सेवानिवृत्त डॉक्टरांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त्या करता येतील. विशेष म्हणजे डॉक्टरांच्या वयाच्या 70 वर्षांपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये यांच्या आस्थापनेवरील अतिविशेषोपचार विषयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक गट-अ ही पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत.
प्राध्यापक
उर्वरित महाराष्ट्रातील चिकित्सालयीन
संस्था – 1 लाख 85 हजार रुपये.
चंद्रपूर, गोंदिया, बारामती, नंदूरबार, धुळे, यवतमाळ, अंबाजोगाई, अलिबाग, सातारा, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद यासारख्या नगरपालिका तसेच क व ड वर्गवारीतील महानगरपालिका क्षेत्रात स्थापन झालेल्या व भविष्यात अशा दूरस्थ भागात स्थापन होणार्या चिकित्सालयीन संस्था -2 लाख रुपये.
अतिविशेषोपचार -2 लाख 30 हजार रुपये.
सहयोगी प्राध्यापक
उर्वरित महाराष्ट्रातील चिकित्सालयीन
संस्था – 1 लाख 70 हजार रुपये.
चंद्रपूर, गोंदिया, बारामती, नंदूरबार, धुळे, यवतमाळ, अंबाजोगाई, अलिबाग, सातारा, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद यासारख्या नगरपालिका तसेच क व ड वर्गवारीतील महानगरपालिका क्षेत्रात स्थापन झालेल्या व भविष्यात अशा दूरस्थ भागात स्थापन होणार्या चिकित्सालयीन संस्था – 1 लाख 85 हजार रुपये.
अतिविशेषोपचार – 2 लाख 10हजार रुपये.