प्रातिनिधिक छायाचित्र(File Photo)
मुंबई
Satbara Record Update| शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: 'सातबाऱ्या'वरील कालबाह्य, निरुपयोगी नोंदी हटविण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश
Chandrashekhar Bawankule | जिवंत ७/१२ मोहिमे’चा दुसरा टप्पा सुरू
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात जिवंत ७/१२ मोहिमे’चा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. सातबाऱ्यावरील कालबाह्य, निरुपयोगी नोंदी हटवण्यास महसूल विभागाला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश दिले आहेत.
कालबाह्य नोंदींमुळे शेतकऱ्यांना कर्जप्रकरणे, जमिनीच्या खरेदीविक्री व्यवहारात तसेच शासकीय योजनांच्या लाभात अडचणी येत होत्या. त्यामुळे या मोहिमेअंतर्गत तलाठ्यांना संबंधित फेरफार नोंदी घेऊन जुने बोजे व शेरे कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही मोहीम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
