Konkan Underwater Tourism : सिंधुदुर्गात समुद्रतळाशी युद्धनौकेची अनोखी सफर

निवतीजवळ विसावलेली ‌‘एक्स-आयएनएस गुलदार‌’ ठरणार पर्यटकांचे आकर्षण
Konkan Underwater Tourism
सिंधुदुर्गात समुद्रतळाशी युद्धनौकेची अनोखी सफर pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : कोकणच्या निळ्याशार समुद्रात आता पर्यटकांना समुद्राच्या तळाशी जाऊन युद्धनौकेचा थरार अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका ‌‘एक्स-आयएनएस गुलदार‌’ समुद्रतळावर यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली आहे.

या माध्यमातून देशातील पहिले जागतिक दर्जाचे अंडरवॉटर म्युझियम आणि कृत्रिम प्रवाळभित्ती पर्यटन प्रकल्प साकारत असून महाराष्ट्र सागरी पर्यटनाच्या जागतिक नकाशावर झळकणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

Konkan Underwater Tourism
Sindhudurg Tourism 2026 | गुलदार नौकेचे दहा तासांचे 'ऑपरेशन निवती'

‌‘एक्स-आयएनएस गुलदार‌’ ही भारतीय नौदलातील ‌‘मगर‌’ वर्गातील युद्धनौका तब्बल 39 वर्षे सेवेत होती. 83.9 मीटर लांबीच्या या नौकेने उभयचर युद्धकारवाई, सैनिक वाहतूक आणि किनारी सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. 12 जानेवारी 2024 रोजी नौदलातून निवृत्त झाल्यानंतर 19 मे 2026 रोजी निवती रॉक परिसरात सुमारे 22 मीटर खोलीवर ही नौका समुद्रतळावर स्थापित करण्यात आली.

पर्यावरणीय स्वच्छता करूनच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून नौकेची पोलादी रचना आता कृत्रिम प्रवाळभित्ती म्हणून कार्य करणार आहे, असे मंत्री देसाई यांनी सांगितले. फ्लोरिडा (अमेरिका) येथील यूएसएस ऑरिस्कनी आणि ऑस्ट्रेलियातील एचएमएएस स्वॅन यांसारख्या जागतिक दर्जाच्या व्रेक डायव्हिंग स्थळांपासून प्रेरणा घेत हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणातील सागरी पर्यटनाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Konkan Underwater Tourism
Pune Municipal Budget 2026: पुणे बजेट 2026-27: आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि विकासासाठी महत्त्वाकांक्षी निर्णय

भारतातील पहिल्याच एकात्मिक सबमरीन-आधारित अनुभवात्मक पर्यटनाची सुरुवात या प्रकल्पातून होत आहे. पर्यटकांना मार्गदर्शित व्रेक डायव्हिंग, सबमरीन अनुभव, डिस्कव्हर स्कुबा डायव्हिंग, ॲडव्हान्स डायव्हिंग, अंडरवॉटर फोटोग्राफी तसेच सागरी शिक्षण आणि संशोधनाचा अनोखा अनुभव घेता येणार आहे. डायव्हिंग स्लॉट्स, सबमरीन बुकिंग आणि इतर सुविधांची माहिती लवकरच एमटीडीसीकडून जाहीर करण्यात येणार आहे.

अर्थव्यवस्थेला मिळणार चालना

या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील पर्यटन अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. देश-विदेशातील पर्यटकांच्या वाढत्या आगमनामुळे स्थानिक हॉटेल व्यवसाय, होमस्टे, वाहतूक, खाद्यव्यवसाय, बोट सेवा आणि पर्यटनाशी संबंधित उद्योगांना नवे बळ मिळणार आहे. स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असल्याचा विश्वास मंत्री देसाई यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news