रेपो दराचा निर्णय 6 एप्रिलला

रेपो दराचा निर्णय 6 एप्रिलला
Published on
Updated on

मुंबई : सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक फटका लवकरच बसू शकतो. गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज यासह सर्व प्रकारच्या कर्जांवरील व्याजदर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिझर्व्ह बँकची पतधोरणविषयक बैठक आजपासून सुरू झाली. तीन दिवस चालणार्‍या या बैठकीच्या अखेरच्या दिवशी, म्हणजे 6 एप्रिल रोजी रिझर्व्ह बँक रेपो दरातील वाढ घोषित करू शकते.

किरकोळ चलनवाढ सहा टक्क्यांच्या वर राहिल्याने आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हसह अनेक केंद्रीय बँकांनी व्याजदरात वाढ करण्याची आक्रमक भूमिका घेतल्याने रिझर्व्ह बँक या बैठकीत 0.25 टक्का इतकी वाढ रेपो दरात करील, अशी शक्यता आहे. मे 2022 पासून रिझर्व्ह बँक सातत्याने व्याजदर वाढवीत आहे. आता मात्र ही दरवाढ शेवटची असू शकते, असे तज्ज्ञांचा कयास आहे. ग्राहक किंमत निर्देशांक आधारित महागाई जानेवारीमध्ये 6.52 टक्के आणि फेब्रुवारीमध्ये 6.44 टक्के होती. किरकोळ महागाईचा हा स्तर आरबीआयच्या सहा टक्क्यांच्या समाधानकारक पातळीपेक्षा जास्त आहे. अ‍ॅक्सिस बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ सौगता भट्टाचार्य यांनी अलीकडेच सांगितले की, आणखी एक शेवटची दरवाढ 0.25 टक्क्यांनी होण्याची अपेक्षा आहे. बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांच्या मतानुसर, गेल्या दोन महिन्यांपासून चलनवाढीचा दर सहा टक्क्यांच्या वर राहिल्याने आणि तरलता घटल्याने आरबीआय पुन्हा एकदा रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ करेल अशी शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेची ही पतधोरणविषयक बैठक दि. 3, 5 व 6 अशी तीन दिवस चालणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news