मुंबई सेंट्रल येथील पालिका शाळेच्या इमारतीची तात्काळ दुरुस्ती करा : मनसेची मागणी

मुंबई सेंट्रल येथील पालिका शाळेच्या इमारतीची तात्काळ दुरुस्ती करा : मनसेची मागणी
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई पालिकेच्या डी विभागांतर्गत असलेल्या गिल्डर लेन मुन्सीपल स्कूलच्या इमारतीची बिकट अवस्था झाली आहे. रात्र शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना अंधारातच शिक्षण घ्यावे लागत आहे. या शाळेच्या इमारतीची तात्काळ दुरुस्ती करावी. तसेच स्वच्छता व विद्युत रोषणाईची तात्काळ सोय करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

मनपा डी विभाग अंतर्गत प्रभाग क्र २१६ मधील गिल्डर लेन शाळेच्या इमारतीची तीन वर्षांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. पुन्हा या इमारतीची बिकट अवस्था झाली आहे. येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. पण शाळेत सुविधांची वाणवा आहे. शाळेचा परिसर अस्वच्छ असून परिसरात विजेची कमतरता आहे. त्यामुळे रात्र शाळा भरणाऱ्या या शाळेचे वर्ग अंधारातच भरवले जात आहेत. महानगरपालिका एकीकडे मोठमोठे प्रकल्प राबवून लाखो रुपये खर्च करते. दुसरीकडे मात्र मनपाच्या शाळांच्या इमारती नादुरुस्त आहेत. याकडे पालिका दुर्लक्ष करत आहे. या शाळेच्या समस्यांबाबत लेखी तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे येत्या १५ दिवसांत शाळेच्या इमारतीची दुरुस्ती व स्वच्छता करावी तसेच विद्युत रोषणाईची व्यवस्था करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अनिल नागरे, सचिन विचारे, केशव मुळे, निलेश शिरधणकर यांनी पत्राद्वारे दिला दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news