

Relatives enter Raj-Uddhav unification talks
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गट यांच्या युतीची जोरदार चर्चा चालू आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षातील काही नेत्यांनीही ही युती व्हायला हवी, अशी जाहीर भूमिका घेतली आहे. ठाकरे गटानेही या युतीबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं आहे. असे असतानाच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधूंच्या युतीच्या चर्चेत आता ठाकरे कुटुंबाच्या नातेवाईकांची एन्ट्री झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, राज आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांच्या युतीच्या चर्चेत आता त्यांच्या नेतेवाईकांची एन्ट्री झाली आहे. या दोन्ही भावांत नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद चालू आहे, असे सूत्रांनी सांगितले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अद्याप थेट संवाद चालू झालेला नाही, असेही सूत्रांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांत वेगवेगळ्या कौटुंबिक सोहळ्यांत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र पाहायला मिळाले होते. मात्र, अद्याप या दोन्ही भावांत थेट चर्चा झालेली नाही, असे सूत्रांकडून समजते.
दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आमच्या बाजूने या युतीसाठी सकारात्मक आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांच्यापासून ते आमच्यापर्यंत असे सगळेच लोक या युतीसाठी सकारात्मक आहोत.