RBI Interest Rate Hike: व्याजदरामध्ये आणखी अर्धा टक्का वाढ होणार; ‘एसबीआय’चे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांचा दावा

एसबीआय अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांचा अंदाज; वाहन कर्ज, गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या मागणीवर परिणाम होण्याची शक्यता
RBI
RBIPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) डिसेंबर महिन्यात कर्ज व्याज दरात आणखी अर्धा टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) अध्यक्ष सी. एस. शेट्टी म्हणाले. त्यामुळे कर्ज मागणीत घट होण्याचा अंदाजही त्यांनी वर्तविला आहे.

मुंबईत आयोजित बीएफएसआय इनसाईट समिटमध्ये ते म्हणाले, व्याज दरांचा परिणाम कर्जाच्या मागणीच्या स्वरूपावर आणि प्रमाणावर नक्कीच होईल. हा परिणाम लगेच दिसून येईलच असे नाही.

RBI
Jogeshwari Trauma Hospital: जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालय पुन्हा चर्चेत! १५ दिवसांत तीन मृत्यू, उपचारांवर प्रश्नचिन्ह

जसजसा काळ पुढे जाईल, तसतसा हा परिणाम स्पष्ट होत जाईल. डिसेंबरमध्ये पुन्हा व्याज दर वाढले, तर व्याज दरांशी संवेदनशील असलेल्या ऐच्छिक कर्ज क्षेत्रांवर (वाहन, तारण, वैयक्तिक कर्ज) काही प्रमाणात घट दिसून येऊ शकते.

RBI
Mumbai Land Acquisition: विकासकामांसाठी भूसंपादन झाले, पण पुनर्विकासात अडथळे!

आपण अशा एका टप्प्यात प्रवेश करत आहोत जिथे व्याज दर वाढत आहेत. परंतु त्याच वेळी कर्जाची वाढही भक्कम आहे. एका बाजूला व्याज दर वाढत आहेत; तर दुसरीकडे ७.१ टक्के आर्थिक वाढीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेकडून कर्जाची मागणी कायम राहील, ज्यामुळे कर्जाच्या वाढीचा वेगही टिकून राहील, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news