

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज गुरुवार रोजी एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. (Ratan Tata passed away)
ख्यातनाम उद्योजक, भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनलेले उद्योगपती आणि टाटा उद्योग समूहाचे अध्वर्यू रतन नवल टाटा (Ratan Tata) यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने निधन (Ratan Tata passed away) झाले. त्यांच्या जाण्याने उद्योगजगतातील लखलखता ध्रुवतारा निखळला आहे. दरम्यान, रतन टाटा (Ratan Tata) यांच्या स्मरणार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा (Ratan Tata) यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
गेल्या सोमवारी पहाटे रक्तदाब कमी झाल्याने रतन टाटांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीबद्दल सोशल मीडियावर चिंता व्यक्त होऊ लागली आणि रुग्णालयाकडून कोणतेही निवेदन येत नसल्याने प्रत्येकाच्या मनात काहूर उठले होते. ते लक्षात घेऊन स्वत: रतन टाटा यांनी इन्स्टाग्रामसह सामाजिक माध्यमांवर पोस्ट शेअर करत रतन टाटा यांनी आपण ठणठणीत असल्याचे सांगितले होते. वयोमानानुसार वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल झालो असून, काळजीचे कारण नाही, असे आश्वस्त करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनदेखील त्यांनी केले होते. त्यानंतर मात्र त्यांच्याकडून कोणतीही पोस्ट आलेली नाही. आपली तब्येत चांगली आहे, हे सांगणारी त्यांची पोस्ट शेवटची ठरली. (Ratan Tata passed away)