Ramrao Adik case : रामराव आदिकांची पत्नी भासवून पेन्शन लाटली

सत्र न्यायालयाकडून आरोपी महिलेला अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर
Court Case
Court CasePudhari
Published on
Updated on

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांची विधवा पत्नी असल्याचा बनाव करून पेन्शन लाटली, असा आरोप असलेल्या महिलेला सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. आदिक यांचे चिरंजीव पृथ्वीराज यांनी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. लेखा पाठक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. डॉ. लेखा पाठक यांनी आदिक यांची विधवा म्हणून पेन्शन मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवल्याचाही आरोप आहे.

पोलिसांकडून अटक होण्याच्या शक्यतेने डॉ. लेखा पाठक यांनी 5 मे रोजी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यांचा अर्ज मंजूर करताना न्यायालयाने मरीन ड्राइव्ह पोलिसांना डॉ. पाठक यांना अटक न करण्याचे निर्देश दिले. पृथ्वीराज यांच्या तक्रारीनंतर महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे हा खटला सुरू झाला. डॉ. पाठक यांनी मंत्रालयात बनावट कागदपत्रे सादर केली. ऑगस्ट 2007 मध्ये आदिक यांच्या निधनानंतर डॉ. पाठक यांनी विधवा म्हणून पेन्शन मिळवली. मुळात डॉ. पाठक आणि आदिक यांच्यामध्ये कधीही कायदेशीररित्या विवाह झाला नव्हता, असा दावा तक्रारदार पृथ्वीराज यांनी केला.

Court Case
Vijay Vadettiwar's allegations | परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी 200 कोटींची जमीन 3 कोटींना घेतली
  • डॉ. पाठक यांनी जामीन अर्जात दावा केला की आदिक आणि त्यांची पहिली पत्नी शोभा यांनी जून 1989 मध्ये घटस्फोटाच्या करारावर स्वाक्षरी केली होती. 24 डिसेंबर 2006 रोजी आदिक यांनी सही केलेल्या त्यांच्या शेवटच्या मृत्युपत्रानुसार मुंबई उच्च न्यायालयात मृत्युपत्राची कार्यवाही झाली, असे म्हणणे डॉ. लेखा पाठक यांनी सत्र न्यायालयात मांडले.

Court Case
Municipal Councils-Municipal Panchayats Election | मतयंत्रात बंद होणार 1.7 कोटी मतदारांचा कल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news