Ramesh Mhatre Jail Release-गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेचा कारागृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा

गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेचा कारागृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा
रमेश म्हात्रे
रमेश म्हात्रे
Published on
Updated on

मुंबई : डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेचा कारागृहातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आरोपींची ओळख परेड झाल्यानंतर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने कठोर सशर्त अटीवर म्हात्रे यांच्या जामिनावरील स्थगिती उठवण्याचे संकेत गुरुवारी दिले.

रमेश म्हात्रे
Sanjay Gandhi National Park-संजय गांधी उद्यानाची एक हजार एकर जमीन वन विभागाचीच

डॉक्टरांवरील हल्ला आणि त्यानंतर डॉक्टरांनी संप पुकारण्याचा दिलेला इशारा, पार्श्वभूमीवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली होती.

रमेश म्हात्रे
Radical Publications ban: महाराष्ट्र सरकारने ११४ कट्टरपंथी प्रकाशनांवर बंदी घातली, राजपत्र अधिसूचना जारी

ओळख परेड झाल्यानंतर खंडपीठाने आरोपपत्र दाखल होईपर्यंत महाराष्ट्राच्या हद्दीबाहेर राहण्याचे निर्देश तसेच मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असाल तिथल्या स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी अनिवार्य, खटला संपेपर्यंत दर बुधवारी पोलीस ठाण्यात हजेरी अनिवार्य, खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत कुठल्याही पद्धतीने साक्षीदारांची तसेच पीडित डॉक्टरशी संपर्क साधण्यास मनाई, खटला संपेपर्यंत पासपोर्ट न्यायालयात जमा करण्याचे निर्देश, आदी अटींसह जामिनावरील स्थगिती उठवण्याचे संकेत देत सुनावणी उद्या शुक्रवारी निश्चित केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news